‘वय झालंय तुमचं, हे बोलणं शोभत नाही..,’; रुपवते यांचा वाकचौरेंना शाब्दिक टोला
Ahmednagar News : ज्यांनी शिवबंधन तोडलं ज्यांनी साईबाबांची शपथ मोडली अशांना जनता विसरणार नाही. ते कितीही हवेत असतील तर ग्राउंड वर उतरवून काम करावी, असं खुद्द नामदारांनी त्यांना सांगितलं. आपण दुसऱ्यांवर काय टीका करतो हे आपण जाणलं पाहिजे. हे आपल्या वयाला शोभत नाही किंबहुना आपले वय झालं आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchoure) यांना जोरदार शाब्दिक टोला लगावला.
मोदींकडून पवारांचा ‘भटकती आत्मा’ उल्लेख, महायुतीला पडणार महागात?, अजित पवारांकडून डॅमेज कंट्रोल
वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने शिर्डी लोकसभा निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढली आहे. शिर्डी लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून येथे 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवाराकडून जोरदार प्रचार सुरू असून नागरिकांच्या भेटीगाठी देखील घेणे सुरू आहे. याचा शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते या चांगल्या सक्रिय झाल्या आहेत. रूपवते यांना मिळणारा जनतेचा पाठिंबा पाहता आता प्रतिस्पर्धी उमेदवारांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. यातच आता टीका टिप्पणी सुरू झाली असून आता रूपवते यांच्याकडून देखील प्रत्युत्तर दिले जात आहे.
महाविकास आघाडीतून उमेदवार असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरती बोलताना रूपवते म्हणाल्या की, वाकचौरे यांनी साईबाबांची शपथ मोडली हे शिर्डीकर विसरलेले नाहीत. तसेच शिवसैनिकांनी हे विसरू नये, वाकचौरे यांनी शिवबंधन तोडले होते. शिर्डीतील सर्वसामान्य जनता हे विसरलेली नाही, असा जोरदार टोला यावेळी रूपवते यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना लगावला.
‘PM मोदींनी शरद पवारांना म्हटलं नाही’; ‘भटकती आत्मा’वर विजय शिवतारेंनी मौन सोडलं…
तसेच यावेळी आजी-माजींवर हल्लाबोल करताना रूपवते म्हणाल्या की, दोन्ही उमेदवारांनी आजवर काय काम केली हे जनतेला चांगलंच माहिती आहे. किंबहुना न केलेली काम ही जनतेने बघितलेली आहे. जनतेला एक चांगला सुशिक्षित उमेदवार जो आपले प्रश्न मांडू शकतो, तुम्ही देखील त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता असा उमेदवार हवा होता. आपल्या मतदारसंघातील प्रश्नांची जाण हवा असणारा उमेदवार जनतेला पाहिजे होता. आम्ही वंचितचे उमेदवार नाही तर जनतेचे उमेदवार म्हणून या निवडणुकीत उतरलो असल्याचं यावेळी बोलताना उत्कर्षा रुपवते म्हणाल्या आहेत.
वंचित बी टीम… रुपवतेंचा विरोधकांना सवाल :
ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला वंचितकडून प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला, त्या ठिकाणी तरी त्यांनी पाठिंबा नाकारला नाही. मग त्या ठिकाणी वंचित बी टीम होत नाही. त्यावेळेस वंचित स्वतःचे उमेदवार उभे करतील, स्वतःच्या हिमतीवर मते मागतील. आम्ही निवडणूक लढवतोय तर आम्ही बी टीम कशी होऊ शकतो, असा सवाल देखील यावेळी रूपवते यांनी विरोधकांना केला.