लोकसभा झाल्यावर आम्हाला वाऱ्यावर सोडू नका…कर्डिले असं का म्हणाले?

लोकसभा झाल्यावर आम्हाला वाऱ्यावर सोडू नका…कर्डिले असं का म्हणाले?

Ahmednagar : राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका असून त्या अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. नुकतेच नगर शहरात महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी जोरदार राजकीय फटकेबाजी देखील झाली. आम्हाला देखील विधानसभा निवडणूक लढवायची आहे. येणाऱ्या लोकसभेमध्ये एकमेकांना एकमेकांची गरज भासणार आहे तर आम्ही तुम्हाला मदत करू मात्र, लोकसभेनंतर आम्हाला वाऱ्यावर सोडू नका. तसेच येणाऱ्या निवडणुका आपण जर एकाच छताखाली लढलो तर नक्कीच विजयी होऊ, असं माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) म्हणाले आहेत.

काही जण मुलांनाही सोबत नेत आहेत, हा दौरा की सहल? आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर CM शिंदेंचा दावोस दौरा

यावेळी बोलताना म्हणाले की, बरेचदा असं घडतं की लोकसभेच्या अनुषंगाने उमेदवारांना सगळ्यांचीच गरज असते. याच्याकडे गेल्या तर त्याला राग येतो त्याच्याकडे गेला तर याला राग येतो तब्येचे उमेदवाराला सकाळी एक आकडे तो दुपारी दुसऱ्याकडे तर संध्याकाळी देखील दुसरीकडे जावं लागतं अशी परिस्थिती सध्या प्रत्येक उमेदवारांची राज्यात दिसून येत आहे. उमेदवाराला सध्या फिरावे लागत आहे.

उद्धव ठाकरे-शरद पवार म्हणजे विक्रम वेताळची जोडी, मंत्री विखेंची खोचक टीका

महायुतीचं सरकार आहे राज्यात वरती सर्वजण एक झाले आहेत लोकसभा देखील आपण एकत्रित लढणार आहोत मात्र येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका देखील आहेत यामध्ये काय होणार हे आम्हाला माहिती नाही मात्र लोकसभा व विधानसभा एकत्रित झाली तर आम्ही सुखरूप राहो असा देखील यावेळी बोलताना आले कर्डिले म्हणाले.

10 वर्षांपूर्वीच्या मदतीची PM मोदींनी ठेवली आठवण : अमेरिकेतील मित्राला राम मंदिर सोहळ्याचे ‘खास’ निमंत्रण

यावेळी मंचावर उपस्थित असलेले मंत्री विखे यांना कर्डिले म्हणाले की, आपल्या माध्यमातून तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण केंद्रातील मोदी शहा यांना निरोप द्यावा की देशाच्या निवडणुकांसोबतच महाराष्ट्राच्या देखील निवडणुका घेऊन टाकाव्यात, असंही कर्डिले म्हणाले आहेत.

खासदार लोखंडे यांचा भविष्यकार नेमका कोण?
शिर्डी लोकसभेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे नशीबवान आहेत. लोखंडे सारखं नशीब दुसरं कोणाला मिळालं नाही. त्यांचा भविष्यकार नेमका आहे तरी कोण? मला माहित नाही मात्र त्यांनी एकदा त्यांच्या भविष्यकाराची भेट आम्हाला घडवून द्यावी मला देखील तुमच्यासारखं निवडणुकीत आठ दहा दिवसात खासदार कसं होतं होईल? हे सांगावं असं शिवाजी कर्डिले म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube