बीडच्या स्वाभिमानी सभेनंतर आता शरद पवार यांची पुढील ‘स्वाभिमान सभा’ 4 सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीत अजित पवारांनी उभी फुट पाडून भाजपसोबत घरोबा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनासाठी पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरले आहेत. गुजरात खालसा करण्याची जबाबदारी पुन्हा मराठी माणसावर; वासनिकांकडे मोठी जबाबदारी काही दिवसांपूर्वीच शरद पवार […]
बीड : स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्याप्रमाणेच त्यांच्या नातवानेही निष्ठेच्या बाबतीत तडजोड केलेली नाही, याचा मला आनंद आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे तोंडभरुन कौतुक केले. ते बीड येथील राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी सभेची तयारी पाहुनही पवार यांनी आमदार क्षीरसागर यांच्या कष्टाचे कौतुक केले. तसंच त्यांना […]
अहमदनगर – राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी कुचराई होत असल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी 17 ऑगस्ट रोजी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली. तर पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्लाचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यात पत्रकारांवर वारंवार जीव घेणे हल्ले करुन, त्यांचा आवाज दाबण्याचा […]
Sujay Vikhe : नगर शहरातील भाजपचे खासदार सुजय विखे यांचा कसा पराभव करता येईल तसेच नगर व शिर्डी लोकसभेसाठी कोणता उमेदवार उभा करता येईल याबाबत चर्चा झाल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. राज्यात आगामी काळात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यातच नुकतेच अहमदनगरच्या ठाकरे गटाच्या […]
धनंजय मुंडे, बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा चेहरा. पण तेच अजित पवार यांच्या गटात गेल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला. त्यांच्यापाठोपाठ माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे हेही अजितदादांच्याच व्यासपीठावर जाऊन दाखल झाले. कधीकाळी फक्त ‘शरद पवार’ या नावाभोवती फिरणारा जिल्हा अचानकपणे अजित पवार यांच्या नावाभोवती फिरु लागला. यामुळे शरद पवार यांचे वलय […]
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये भव्य जाहीर सभा पार पडली. बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातून अनेक बडे नेते, आजी, माजी आमदार पवारांच्या या सभेसाठी उपस्थित होते. पवारांच्या सभेसाठी बीडसह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातून अनेकांनी उपस्थिती दर्शविली होती. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत सभा यशस्वी […]