मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत जेलमध्ये शंभर दिवस राहिले, तेव्हापासून त्यांचा स्वभाव बदलला. ते आता कैद्यांसारखी भाषा बोलायला लागले आहेत, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना […]
विधिमंडळ अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा चालू आहे. वेगवेगळ्या मुद्दावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असताना आज विधिमंडळात एक नवीन चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे माढाचे आमदार बबनदादा शिंदे आज थेट सत्ताधारी बाकावर दिसले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात उत्तरे देत होते, त्यावेळी अचानक बबनदादा त्यांच्या मागच्या बाकावर येऊन बसलेले दिसले. विधिमंडळात सर्व सदस्यांच्या बसायच्या जागा […]
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला परिसरात कल्याण गायकवाड यांच्या घरी १४ मार्चला सशस्त्र दरोडा पडला होता. या दरोड्यात कल्याण गायकवाड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून चार आरोपींना जेरबंद केले. यात निमकर अर्जुन काळे (वय २१, रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर), शेखर उदास भोसले (वय २०, रा. कोळगाव, ता. […]
Aaditya Thackeray in Budget Session : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनामध्ये सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर तुटून पडताना आपण पाहिले आहेत. अनेक युवा आमदार हे रोखठोक आपली भूमिका मांडत असतात. त्यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे विविध प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरताना दिसून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्यापासून आदित्य ठाकरे […]
मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra)आणि मुंबईबद्दल (Mumbai)केंद्रातील (भाजप) सरकारला कायम आकस राहिला आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा विडाच केंद्र सरकारने (Central Government)उचलला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Sarkar)आल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राचे नुकसान करण्यात आले, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केला आहे. आता मुंबईतीमधील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय (Textile Commissioner […]
अहमदनगर : गुढीपाडव्यापासून सुरु होणारे मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गेल्या २० वर्षापासून भव्य संगीत सांस्कृतिक रसिकोत्सवाचे आयोजन नगरच्या रसिक ग्रुपच्या वतीने केले जात आहे. यावर्षी २१ व्या रसिकोत्सव बुधवार (दि.२२) रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडीच्या जॉगिंग पार्कच्या मैदानावर होणार आहे. या रसिकोत्सवाला नामवंत गायक-गायिका, नृत्यांगना व दिग्गज कलाकारांची हजेरी लागणार आहे. यावर्षी महाराष्ट्राचा […]