अहमदनगरः कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार या थेट ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणूक लढल्या. निवडून येत संगमनेर तालुक्याच्या निळवंडे गावच्या सरपंच झाल्या आहेत. शशिकला पवार यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत सुशिला उत्तम पवार यांचा २२७ मतांनी पराभव केला. संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात थोरात गटाने २७, विखे गटाने ९ […]
मुंबई : स्टार प्रवाहवरील आघाडीची मालिका ‘रंग माझा वेगळा’ या मलिकेमध्ये आता जेनिलिया देशमुखची खास एन्ट्री होणार आहे. रितेश आणि जेनिलियाचा आगामी वेड सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जेनिलिया देशमुख ‘रंग माझा वेगळा’ या मलिकेमध्ये येणार आहे. जिनिलियासोबतचा हा भाग खास असेलच पण प्रेक्षकांना ज्या दिवसाची गेले कित्येक दिवस उत्सुकता होती तो दिवस अखेर आलाय. या मालिकेने […]
अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत थोरात-विखे गटातील राजकीय संघर्ष पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे जन्म गाव असलेल्या जोर्वे गावासह तीन ग्रामपंचायतीतील सत्ता थोरात गटाला गमवावी लागली आहे. तर थोरात गटानेही निमगाव जाळी व उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीत विखे गटाला प्रतिधक्के दिले आहेत. संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात थोरात […]
नागपूर : अडीच महिन्याच्या बाळासह विधिमंडळात आलेल्या आमदार सरोज अहिरेंच्या हस्ते नागपूर विधिमंडळ इमारतीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. आरोग्य […]
नागपूर : कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा उपस्थित करताना […]
नागपूर : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी श्रध्दा वालकर प्रकरणाची विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करणारी लक्षवेधी विधानसभेत मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशिष शेलार यांची मागणी मान्य करीत विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्याची घोषणा केली. ‘कोणत्याही जाती-धर्माची मुलगी असली तरी सरकारने काळजी केली पाहिजे. श्रध्दा वालकर प्रकरणात […]