सांगली : आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री विजय झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सातही जागांवर पडळकर समर्थक सदस्य विजयी झाले आहेत. तर सरपंचपदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या ३०० मतांनी निवडून आल्या आहेत. जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत […]
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या तुंगत ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसच्या प्रकाश पाटलांनी भाजपच्या प्रशांत परिचारकांना जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसच्या प्रकाश पाटलांच्या गटाने या ठिकाणी सरपंचपदासह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला. पंढरपूर तालुका ग्रामपंचायत निवडणुक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंढरपूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीची सत्ता आली तर तुंगतमध्ये कॉंग्रेसचे नेते […]
बीड : परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादीने सर्वाधिक 28 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाला फक्त 12 ठिकाणी विजय मिळवता आल्याचं पाहायला मिळतंय. परळी विधानसभा मतदारसंघातसर बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवल्यानंतर आमदार धनंजय […]
औरंगाबाद : जिल्ह्यात 208 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते. आज सकाळी आकरा वाजता ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरवात झाली. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. पैठण तालुक्यातील शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची बनलेली बिडकीन ग्रामपंचायत ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. आता वैजापूर तालुक्यातील महालगावची ग्रामपंचायत देखील ठाकरे गटाच्या ताब्यात गेली आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश […]
अहमदनगर : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. यातच जिल्ह्यातील काही तालुक्यातील निकाल हाती आले आहे. यात शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीकडे 8, भाजपाकडे 3 तर जनशक्तीकडे 1 सरपंचपद गेले आहे. सरपंचपदाची जनतेतून निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीसाठी तहसील कार्यालयात आज मंगळवारी मतमोजणी झाली. […]
अहमदनगर : कोपरगांव तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या २६ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून पहिल्या फेरीतील आघाडीची शिंगणापूर ग्रामपंचायत कोल्हे गटाने जिंकली आहे. यात सरपंच पदासह १४ जागावर विजय मिळवला आहे. तर यात आ. काळे गटाला मात्र केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. दरम्यान पहिल्या टप्प्यात मतमोजणी झालेल्या सडे ग्रामपंचायत निवडणुकीत पाच जागांसह सरपंच पदावर आ. […]