Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा अपमान आम्हाला अजिबात सहन होणार नसल्याचा इशाराच भाजपचे जिल्हाध्य़क्ष, खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली आहे. दरम्यान, अमरावतीत संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर राज्यभरातून विरोधकांकडून भिडेंच्या विधानाचा निषेध करण्यात आला. त्यातच आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही भिडेंवर टीकेची तोफ डागली […]
सांगलीत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करुन त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यात आले आहे. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडेंनी केलेल्या विधानाचं समर्थन केलं आहे. भिडे यांनी केलेल्या विधानानंतर राज्यभरातील सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता भिडेंच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करुन विधानाचं समर्थन केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ‘आनंद दिघेंचं नाव […]
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील कायदा व सुव्यवस्था सध्या अक्षरश: धोक्यात आली आहे. दरदिवशी गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच नगरमध्ये अगदी सिनेमाला शोभेल अशी घटना घडली आहे. काही जण दुचाकीवर आले त्यांनी एक चालू बसला रस्त्यातच थांबवले. बसमध्ये बसलेल्या दोन मुलींना मारहाण करत आपल्यासोबत घेऊन गेले. अचानक झालेल्या घटनेनं बसमधील […]
Nitin Gadkari News : लोक म्हणतात तुम्ही काहीही स्वप्न दाखवता, पण लक्षात ठेवा स्वप्न दाखवणारे नेतेच लोकांना आवडतात, पण दाखवलेले स्वप्न पूर्ण करीत नाही अशा नेत्यांची लोक धुलाई केल्याशिवाय देखील राहत नसल्याची टोलेबाजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात गडकरींनी हे भाष्य केलं आहे. […]
मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचे प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयात गेले आहे. मुख्य याचिकाकर्त्यांनी आधीची याचिका मागे घेतल्यानंतर दुसऱ्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. त्यानुसार कोल्हापूरचे ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर उद्या (सोमवारी) सुनावणी होण्याची शक्यता असून स्थगितीबाबत काय होणार हे […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या मंगळवारी (1 ऑगस्ट) एकाच मंचावर येणार आहेत. दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी पुण्यात 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या कार्यक्रमसाठी शरद पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. पण या सोहळ्याची […]