नाशिक : “देशातील असं एकही राज्य नाही जिथं मी काँग्रेस पक्षाचं संघटनात्मक काम केलं नाही. राज्यातील एकही तालुका आणि गाव नाही, जिथं मी काँग्रेसचं संघटनात्मक काम केलं नाही.” असं वक्तव्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केले आहे. नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसमधून बाहेर पडून सत्यजित तांबे यांनी स्वतः […]
नाशिक: नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येऊन शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवळाली गाव परिसरात काल सायंकाळी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकात राडा होऊन शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटेंचा मुलगा स्वप्नील याने बंदूक काढत हवेत गोळीबार केल्यामुळे […]
अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयात काल दुपारच्या दरम्यान दोन गटांत वाद झाल्याची घटना घडली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीत म्हंटलं की, अहमदनगर महाविद्यालयात शिकत असलेल्या करण पाटील नामक विद्यार्थी त्याच्या मित्रांसह महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठीचं निवेदन देण्यासाठी प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात होता. पाटील प्राचार्यांच्या कार्यालयाकडे जात असतानाच […]
कोल्हापूर : सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना पक्षाने डावलले नसून कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबियांनी घ्यायचा होता. काँग्रेस तसे अधिकार त्यांना दिले होते असे परखड मत कॉंग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) यांनी व्यक्त केले. ते आज कोल्हापूरात सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासह पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पत्रकार परिषदेत नाशिक पदवीधर […]
मुंबई : सरकारी बंगल्यात रिल्स स्टार रियाझ अलीसोबत(RiyaazAli) अमृता फडणवीसांनी(AmrutaFadnvis) रिल्स बनवल्याने सध्या सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे. सरकारी बंगल्यात रिल्स बनवल्याप्रकरणी अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादात सापडल्याचं दिसून येतंय. हा व्हिडिओ सरकारी बंगल्यात केला असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या हेमा पिंगळे यांनी केलाय. अमृता फडणवीस यांनी रियाझ अलीसोबत ‘आज मैं मूड बना लीया’ या […]
मुंबई : 25 वर्षांपासून शिवसेनेसोबत असलेला भाजप नामानिराळा कसा काय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत विविध विकास कामांचं उद्घाटन करताना विरोधकांवर टीका केलीय. त्यानंतर नाना पटोलेंनी सवाल उपस्थित करीत प्रत्युत्तर दिलंय. यावेळी नाना पटोलेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. पुढे बोलताना पटोले म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत २५ […]