वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काशी विश्वनाथ मंदिराचा (Kashi Vishwanath Temple) कायापालट केला तशाच प्रकारे आमचं सरकार देखील बंजारा काशीचा कायापालट करील. मागच्या काळात आपण मोठं काम सुरु केलं होतं पण गेल्या अडीच वर्षात फुटकी कवडी देखील मिळाली नाही. जे आपण दिले होते त्यानंतर एक पैसा मिळाला नाही. सेवालाल महाराजाच्या महिमेने जे […]
नाशिक : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपती (President) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे उशिरा का होईना, सरकारला सुचलेले शहाणपण आहे. पण राज्यपाल कसा नसावा हे भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाहिले की लक्षात येते. नवीन येणारे राज्यपाल (Governer) रमेश बैस (Ramesh Bais) यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या चुका लक्षात ठेवाव्यात. […]
अहमदनगर : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर (Ahmednagar) शहराजवळील बुरुडगाव येथे असलेल्या आशुतोष महादेव मंदिरात कीर्तन सोहळा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त कालीचरण महाराज व करवीरपीठाचे शंकराचार्य 17 फेब्रुवारीला अहमदनगर शहर व बुरुडगाव येथे येणार आहेत, अशी माहिती राहुल दरंदले महाराज यांनी दिली. बुरुडगाव येथील आशुतोष महादेव मंदिर येथे सालाबाद प्रमाणे त्रिदिनीय कीर्तन सोहळा […]
वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या उपस्थितीत रविवारी पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण (Unveiling of the statue of Sant Sewalal Maharaj)करण्यात आलं. या कार्यक्रमाला सोहळ्याला स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, हा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा बराच उशीरा सुरु झाला. त्यामुळं मंडपात बसलेल्या लोकांनी गोंधळ घालायला […]
नाशिक : महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivajimaharaj), महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीबाई फुले (Savitrobai Phule) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) या महापुरुषांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांनी सातत्याने अपमान केला. त्यांच्याविरोधात राज्यातील जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलन केली. तरीही त्यांना दीड महिने पदावर ठेवले. खरंतर राज्यपाल कोश्यारीना आधीच पदावरून […]
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana)नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी शनिवारी (दि.11) फेब्रुवारीला बुलढाणा (Buldhana)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या आंदोलनाच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर देखील पोलिसांकडून लाठीमार (Lathicharged by police on journalists) करण्यात आला. यानंतर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस (City Police)ठाण्यात नेले. यावेळी पोलिसांनी पत्रकारांना देखील ठाण्यात जाण्यासाठी मज्जाव […]