औरंगाबाद – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाकडून आज महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंह युक्तिवाद करत आहेत. जेठमलानी यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यावेळी त्यांनी म्हटले, की शिंदे गटात गेलेल्या ३४ आमदारांना जीवाची भीती होती. नऊ दिवसात सर्व घडामोडी घडल्या. अपात्रतेची नोटीस 22 जून रोजी नाकारण्यात […]
मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) शहरांचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान या दोन्ही शहरांची नावे बदलण्यासंदर्भात केंद्र सरकारने न्यायालयात महत्वाची माहिती दिली.उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’ करण्यास हरकत नाही. तसेच औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याबाबत विचार सुरू आहे, असे उत्तर केंद्र सरकारने दिले. […]
ठाणे : एखाद्याच्या कुटुंबाबद्दल इतकं वाईट बोलून षडयंत्र रचणं, कुणा बाबाचं नाव घेऊन पैशांच्या आणि जमिनीच्या व्यवहाराबद्दल बोललं गेलंय. एखाद्या डॉनप्रमाणं आयुक्त त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra Awhad) यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad)यांनी केलाय. त्या तथाकथित व्हायरल ऑडिओ क्लिपमधला आवाज हा ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) उद्या जळगाव ( Jalagaon ) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, या दौऱ्यात त्यांच्या हस्ते जळगाव आणि चोपडा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. या पुलाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती. आता त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या विषयावरून गुलाबराव पाटलांनी […]
मुंबई : तुळापूर-वढू (Tulapur-Vadhu) येथील छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या स्मारकाच्या आराखड्यात मोठा बदल करण्यात आलाय. पूर्वीचा स्वराज्यरक्षक (Swarajyarakshak)असा उल्लेख वगळून धर्मवीर (Dharmveer)असा उल्लेख करण्यात आलाय. पूर्वी या विकास आराखड्याचे नाव स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असे होते. मात्र ते आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असं करण्यात येणारंय. स्मारकाच्या 397 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला […]
नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis)सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल सलग 2 दिवस सुनावणी झाल्यानंतर आता पुन्हा आज सुनावणी होणार आहे. मंगळवारच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून (Thackeray Group)युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर बुधवारच्या सुनावणीत शिंदे […]