एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवली अन् त्यांना प्रश्न विचारले. पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत.
आमदार किशोर दराडे यांच्या गाडीचा सायरन वाजल्याने पुण्यातील नागरिकाने गाडीला थांबवून त्यातील ड्रावरला चांगलच सुनावलं.
सांगली औद्योगिक वसाहतीतील वेस्टर्न प्रा. लि. कंपनीत भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
कोल्हापूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते. मनसेचे हे बॅनर फाडल्याचे सांगण्यात येत आहे.
रायगड, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान वि भागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.