आघाडी-युतीमध्ये निवडणूक लढवताना सर्वात कळीचा मुद्दा ठरणारी गोष्ट म्हणजे जागा वाटप. कोण, किती अन् कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार या प्रश्नाचे उत्तर शोधताना पक्षाची आणि नेत्यांची पुरती हौस फिटते. त्यानंतर येणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिथून उमेदवार कोण असणार? तो उमेदवार आर्थिकदृष्ट्या सृदृढ असावा, नेता म्हणून ओळखला जावा, लोकसंपर्क असावा आणि सर्वात महत्वाचे निवडून येण्याची क्षमता […]
Sujay Vikhe : कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं (Central government)तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Farmer) नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यातबंदी उठवली आहे. […]
Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अहमदनगर उपक्रेंद्राच्या (University Sub-Centre) नूतन इमारतीचे उद्धाटन येत्या रविवारी (3 मार्च) होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय अखेर मार्गी लागला आहे. बाबुर्डी घुमट येथील तब्बल 83 एकर परिसरामध्ये ही इमारत उभी राहिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. […]
Sharad Pawar Speech in Baramati : राज्य सरकारतर्फे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन बारामती शहरात (Baramati) करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात रोजगाराच्या मुद्द्यावर राज्य सरकारला आमची साथ राहिल असं सांगितलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मंत्री […]
Namo Maharojgar Melava 2024 Baramati : बारामतीमध्ये आज (दि.2) नमो महारोजगार मेळावा पार पडला. यात फडणवीसांनी बारामतीकरांसमोर कोपरखळ्या मारत अजितदादांनी कितीही चांगलं काम केले तरीही गृहखातं देणार नाही असे स्पष्ट विधान केले. विशेष म्हणजे यावेळी मंचावर एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेदांमुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचेच […]
बारामती : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेकदा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजितदादा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांसाठी एका मंचावर आले पण त्यांनी एकमेकांशी संवाद साधणं टाळल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते. त्यानंतर आज (दि.2) बारामतीत नमो महारोजगार मेळाव्यात या दोन्ही नेत्यांमधील दुरावा अधिक वाढल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. बारामतीतील कार्यक्रमाच्या मंचावर अजितदादा आणि पवारांच्या मध्यभागी एकनाथ शिंदे आणि […]