राऊत खोटारडे! आंबेडकरांनी उघडं पाडलं मविआचं पितळं; काँग्रेसलाही दाखवला आरसा

  • Written By: Published:
राऊत खोटारडे! आंबेडकरांनी उघडं पाडलं मविआचं पितळं; काँग्रेसलाही दाखवला आरसा

मुंबई : लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील अंतर्गत बाब समोर येण्यास सुरूवात झाली असून, वेळकाढूपणामुळेच मविआतील जागावाटप लांबल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला आहे. मविआ एकत्र राहिली तर, माझा प्रश्न येतो असे सूचक विधानही आंबेडकरांनी केले आहे. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाही असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणत असतील तर, ते खोटं बोलत आहेत असा घणाघातही आंबेडकर यांनी करत आपल्याला मोदींना हरवण्यासाठी लढायचं आहे, त्यामुळे काँग्रेसने त्यांचा इगो बाजूला ठेवावा असा सल्ला देत आंबेडकरांनी काँग्रसला आरसा दाखवला आहे. (Prakash Ambedkar On MVA Seat Shaiaring)

Lok Sabha Election : महायुतीत धक्कातंत्र? 12 खासदारांना दणका, 8 भाजप उमेदवारांची यादी ‘रेडी’

आम्ही तुमच्या बरोबर पण आधी तुमचं मिटवा…

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये 10 जागांवरून मतभेद आहेत. या जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरे दोघेही आग्रही आहेत. तर, दुसरीकडे राऊत समझोता झाला असं म्हणत असतील तर ते साफ खोटं बोलत असल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केला. “आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आधी तुमचं मिटवा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

‘शिवतारेंचं वक्तव्य संतापजनक, CM शिंदेंनी त्यांना समज द्यावी’; इतिहास सांगत तटकरेंनी फटकारलं

तसेच  मविआतील चर्चेच घोंगड भिजत असलं, तरी काँग्रेस आणि वंचितमधील समझोता पुढे घेऊन जाण्यासाठी चैनीथला यांच्याशी चर्चा केली. पण त्यांच्याकडून दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिल्याचे आंबेडकर म्हणाले. समझोता पुढे नेण्यासाठी हे पत्र पाठवल्याचेही यावेळी ते म्हणाले. पण त्यावर अजून उत्तर आलेलं नाही. आम्ही महाविकास आघाडी सोबत बसलो आहोत, संजय राऊत यांच्या सोबत नाही असं म्हणत आपल्याला मोदींना हरवण्यासाठी लढायचं आहे, काँग्रेसने त्यांचा इगो बाजूला ठेवावा असे सल्ला देत आंबेडकरांनी काँग्रस पक्षातील नेत्यांचे कान टोचले आहेत.

निलेश लंके शरद पवार गटात जाणार? अजितदादांनी एकाच वाक्यात केलं क्लिअर

नवनीत राणा बिगेस्ट फ्रॉड त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी

यावेळी आंबेडकरांनी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, नवनीत राणा या बिगेस्ट फ्रॉड असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राणांचे जात प्रमाणपत्र हे बोगस असून काही दिवसात त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे, त्यामुळे त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी असेही आंबेडकरांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube