एक कार्यकर्ता अन् पुतण्या म्हणून..; अजितदादांना पक्का वादा देत रोहित पवारांची पोस्ट

  • Written By: Published:
एक कार्यकर्ता अन् पुतण्या म्हणून..; अजितदादांना पक्का वादा देत रोहित पवारांची पोस्ट

Rohit Pawar Post On Ajit Pawar Statement : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून माझी बहीण सुप्रिया सुळे (Supria Sule) हिच्याविरोधात माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीची होता, अशी जाहीर कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली. त्यानंतर आता यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली असून, सुप्रिया सुळेंनंतर आता अजितदादांचे पुतणे रोहित पवारांनी यावर पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील असे म्हणत दादांना पक्का वादा केला आहे.

अजितदादांच्या ‘गुलाबी’ जॅकटवरून पॉलिटिक्स; पण रंग नेमका कोणता?; दादांनी उदाहरणासह सांगितलं!

रोहित पवारांची पोस्ट नेमकी काय?

आदरणीय दादा,

खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे.

दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या #कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे असे रोहित पवारांनी (Rohit Pawar) त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

CM पदाचा उमेदवार कोण? मविआ अन् महायुतीचा रिव्हर्स गिअर; नावच जाहीर होईना..

अजितदादांच्या कबुलीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून माझी बहीण सुप्रिया सुळे हिच्याविरोधात माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय चुकीची होता, पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लियामेंटरी बोर्डाने तसा निर्णय घेतल होता. मात्र, एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. आज माझं मन मात्र मला सांगतं की, तसं व्हायला नको होतं असे अजित पवार म्हणाले होते. याबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एक तर मी हे स्टेटमेन्ट ऐकलेलं नाही आणि वाचलेलं नाही. हे सगळं तुमच्याकडूनच ऐकतेय. रामकृष्ण हरी असे सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube