पंचांना लाथ का मारली?, राग अनावर झालेल्या शिवराज राक्षेनं सांगितलं मॅटवर काय घडलं?
Shivraj Rakshe on Maharashtra Kesari Wrestling Tournament : अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पार पडली. मात्र निकाल लागण्यापूर्वीच स्पर्धा विविध वादग्रस्त कारणांमुळे चांगली चर्चेत ठरली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगलेल्या सामन्यांमध्ये राक्षे यांचा (Shivraj Rakshe) पराभव झाला. मात्र पंचांनी आपल्या विरोधात निर्णय दिलेला आहे. मॅच फिक्सिंगचा (Maharashtra Kesari) आरोप करत राक्षे यांनी थेट मंचावरूनच पंचांना धक्काबुक्की करत लाथ मारल्याचं समोर आलं. यावर आता शिवराज राक्षे यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलणार; अर्थसंकल्पावर वादळी चर्चेची शक्यता
शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्या कृत्यामुळे महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा वादग्रस्त ठरली. दोघांचंही तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय. यावर आता शिवराज राक्षे यांची प्रतिक्रिया समोर आलीय. जे झालंय ते चुकीचंच आहे. जी गोष्ट झालीय, ती सर्व जनतेने पाहिली आहे. व्हिडिओ चेक करा म्हणून ज्युरीकडे अपील केलं होतं. त्यानंतर कुस्तीचा निर्णय घ्या, असं म्हटलं होतं. तुम्ही असा निर्णय घेऊ शकत नाही. थर्ड अम्पायरला असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, दोन्ही संयोजकांकडे विनंती केली होती. दोन्ही खांदे टेकले असतील, तर हार मानायला तयार आहोत, असं देखील म्हटलो होतो.
पंचांनी घेतलेला निर्णय जर चुकीचा असेल तर खेळाडूचे नुकसान होते. त्याच्यावर अन्याय होतो. महाराष्ट्रात असे कित्येक खेळाडू असतील. पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचं मीडियासमोर दाखवा, असं म्हटलं होतं. फक्त रिव्ह्यू दाखवा, अशी विनंती वारंवार करत होतो. त्यांनी ते मान्य केलं नाही. मला शिवीगाळ करण्यात आली, त्यानंतर लाथ मारण्याचा प्रकार घडला. मला असा टोकाचा निर्णय घेवा लागला, असं शिवराज राक्षे म्हणालेत. पैलवान गायकवडवर देखील असाच अन्याय झाला, त्यानंतर तो देखील अग्रेसिव्ह झाला, असं शिवराज राक्षे म्हणालेत.
निर्मला सीतारामन या खडूस बाईने सामान्य कुवतीच्या… ठाकरे गटाचे ‘सामना’तून अर्थमंत्र्यांवर आसूड
पंचाची देखील चूक झालीय. त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी पैलवान शिवराज राक्षे यांनी केलीय. पंचांनी स्वत: चूक झाल्याचं मान्य केलंय. जर मग पैलवानांवर कारवाईचा आक्षेप घेतलाय, तर मग पंचांवर पण घेण्यात यावा. जेणेकरून ते पुढील वेळी निर्णय घेताना योग्य विचार करतील. याप्रकरणी आता पुढे कोर्टात जाणार आहे. तो काय निर्णय होईल, तो मान्य असेल असं शिवराज राक्षे यांनी सांगितलंय. काल झालेल्या राड्यामुळे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर पुढील तीन वर्ष निलंबनाची कारवाई केली गेली आहे.