शरद पवार यांनी गद्दार म्हणणं एकनाथ शिंदे यांना झोंबल; पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया
Naresh Mhaske On Sharad Pawar : ठाकरे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सुनावले आहे. शरद पवार यांनी आम्हाला गद्दार म्हणणं शोभत नाही. त्यांनी स्वतची पक्षाची निर्मिती कशी झाली ते लक्षात ठेवावे, अशा शब्दांमध्ये म्हस्केंनी पवारांना सुनावले आहे. शरद पवारांनी शिंदे गटाला गद्दार म्हटल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. यावरुन आता म्हस्केंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवार यांनी आम्हाला गद्दार म्हटंल आहे. शरद पवार हे महाराष्ट्रातील आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आम्हाला गद्दार म्हणणं शोभत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची निर्मिती कशा पध्दतीने झालेली आहे. दोन वेळा कॉंग्रेस पक्ष फोडुन राष्ट्रवादीची स्थापना केली मग याला गद्दारी म्हणायची नाही का?, अशा शब्दांमध्ये नरेश म्हस्केंनी शरद पवारांना सुनावले आहे.
Video : ‘लोक माझे सांगाती’ च्या दुसऱ्या आवृत्तीत आहे तरी काय?
आम्ही केलेली गद्दारी असेल तर तुम्ही केलेली खुद्दारी होती का ? असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच शरद पवार हे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. शरद पवार यांनी आम्हाला गद्दार म्हणण्याअगोदर स्वत:च्या पक्षाची निर्मिती कशी झाली याची जाणीव ठेवणं गरजेच आहे, असे म्हणत शरद पवारांना सुनावले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्यावर ठाकरे गटातून वारंवर गद्दार असा आरोप होतो आहे. तसेच 50 खोके एकदम ओके, अशा घोषणांच्या माध्यमातून शिंदे गटावर टीका करण्यात येते आहे. आता शरद पवारांनी देखील शिंदे गटाला गद्दार म्हटल्याचा आरोप नरेश म्हस्केंनी केला आहे. त्यावर म्हस्केंनी त्यांना जोरदार उत्तर दिले आहे.