“मोदींची माफी राजकीय, महाराष्ट्रानं माफ केलेलं नाही”; राऊतांचं मोदींना प्रत्युत्तर

“मोदींची माफी राजकीय, महाराष्ट्रानं माफ केलेलं नाही”; राऊतांचं मोदींना प्रत्युत्तर

Sanjay Raut replies PM Narendra Modi : छत्रपती शिवाजी महाराज यांच पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj) कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत एका जणाला ताब्यात घेतले. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या घटनेबद्दल राज्यातील जनतेची जाहीर माफी मागितली. यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही (PM Narendra Modi) पालघरमधील सभेत जाहीर माफी मागितली. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोकं ठेऊन माफी मागतो, असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या या माफीनाम्यावर आता विरोधी पक्षांकडून खोचक टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींच्या या माफीनाम्यावर टीका केली. मोदींची ही माफी राजकीय माफी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही, प्रायश्चित अटळ; शरद पवार गटाचा पंतप्रधानांवर निशाणा

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्रात आले वाढवण बंदराच्या संदर्भात भूमिपूजनाचा काहीतरी कार्यक्रम होता तिकडल्या कोळी आणि आदिवासी बांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यांचा निषेध केला. मोदी गो बॅक मोदी परत जा अशा घोषणा दिल्या. मोदींनी पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवरून ज्या पद्धतीने कोसळला आणि संतापाचा लाव्हा इथे महाराष्ट्रात उसळला त्याच्यामुळे जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातल्या संतापाला तोंड द्यावे लागेल त्यामुळेच काल त्यांनी राजकीय माफी मागितली.

सरकारविरुद्ध आंदोलन करणारच

प्रधानमंत्री यांची माफी राजकीय माफी आहे. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माफी मागितलेली बरी म्हणून त्यांनी ही माफी मागितली आहे. माफी मागून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाका असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिला. प्रधानमंत्री यांनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय आहे. पण त्या माफीमुळे प्रश्न सुटत नाही. मोदींनी जरी माफी मागितली असेल. तरी उद्यापासून या राज्यभरात सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे. त्यात कोणत्याही बदल नाही उद्या अकरा वाजता शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतली सर्व घटकपक्ष लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि सरकारला जोडे मारतील असे राऊत म्हणाले.

हरियाणात भाजपला धक्का, मोदी मॅजिक ठरणार फेल? जाणून घ्या नवीन ओपिनियन पोल

महाराष्ट्रानं तुम्हाला माफ केलेलं नाही

प्रधानमंत्री यांना जर खरोखरच अशा घटनांचं गांभीर्य असेल दुःख असेल तर पाच वर्षांपूर्वी पुलवामात आमच्या चाळीस जवानांची हत्या झाली तेव्हाही त्यांनी देशाची माफी मागितली असती. जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मिरी पंडीतांवर अत्याचार होत आहेत. त्याबद्दल माफी मागितली असती. पण प्रत्येक वेळी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कृती करायची पावलं टाकायची ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे. आता ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात आपल्याला माफ करणार नाही पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेले नाही हे तुम्हाला कळेल असा इशारा राऊत यांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube