…म्हणून शरद पवारांसोबत जाण्याची वेळ आली, शेळकेंचा भेगडेंवर थेट आरोप

तळेगाव आणि लोणावळ्यातील सत्तावाटणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर ठरलेला फॉर्म्युला भाजपने पाळला नाही

  • Written By: Published:
News Photo   2025 11 21T213234.517

लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या राजकीय (Election) आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्यात.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे ही निवडणुक चांगलीच चर्चेत आलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठरलेला शब्द बाळा भेगडेंनी फिरवला असा थेट वार शेळकेंनी केला आहे. तसंच, त्यांच्या या भुमिकेमुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्याची वेळ आली असंही शेळकेंनी स्पष्ट केलय.

तळेगाव आणि लोणावळ्यातील सत्तावाटणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर ठरलेला फॉर्म्युला भाजपने पाळला नाही, असा थेट आरोप सुनील शेळकेंचा आहे. शेळके यांच्या म्हणण्यानुसार, पहिले अडीच वर्ष तळेगावात भाजपचा नगराध्यक्ष, तर लोणावळ्यात अजित पवार गटाचा नगराध्यक्ष, असा जाहीर तोडगा ठरला होत. परंतु, बाळा भेगडे यांनी हा शब्द मागे घेतला. त्यामुळे शरद पवार गटाशी हातमिळवणी करत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आणण्याचा निर्णय केला असं शेळकेंच मत आहे.

कुणाचा मुलगा तर कुणाची बायको, कुठं कुणाची भाची तर कुठ मेव्हणा; वाचा बिनविरोध लढाया

लोकसभेवेळी शरद पवारांनी सुनील शेळकेंना सज्जड दम भरला होता. त्यावेळी शरद पवार म्हणतात मला, हे लक्षात ठेवा. असा इशारा दिल्यानंतर शेळके ही संतापले होते. मात्र आज हे सगळं विसरुन भाजपला धडा शिकवण्यासाठी शेळकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली आहे. पहिले अडीच वर्षे तळेगावात भाजपचा नगराध्यक्ष अन लोणावळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष, असा मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला फॉर्म्युला भाजपने पाळला नाही.

हे सगळ पाहता आमदार सुनील शेळके हे लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रमुख रणनीतिकार म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली आहे. या एकत्रित येण्याचा सरळ फायदा लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होणार असून यामुळे नगरपरिषद निवडणूक भाजप विरुद्ध संयुक्त राष्ट्रवादी अशी होणार आहे. लोणावळ्यातील ही नव्याने उभी झालेली राजकीय मैत्री ही निवडणुकीसाठी ‘गेंम-चेंजर’ ठरू शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

follow us