मोठी बातमी! नव्या वर्षात शिक्षकांचा पगार लांबणीवर पडणार, समोर आलं मोठं कारण
Teachers Salary May Delay In New Year : राज्यभरातील शिक्षकांसाठी (Teachers Salary) महत्वाची बातमी आहे. नव्या वर्षात शिक्षकांचा पगार लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार आल्यामुळे कदाचित नव्या वर्षात शिक्षकांना पगारासाठी वाट पाहावी लागू शकते. राज्यभरातील शिक्षकांचा (Teachers) डिसेंबर महिन्याचा पगार उशिराने होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दरमहिन्याला होणारा पगार ठराविक तारखेनंतर दोन ते दिवसांनी होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं कारण काय आहे? असा सवाल देखील यावेळी उपस्थित होतोय. तर लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार आल्याचं सांगितलं जातंय. राज्यभरातील शिक्षकांचे पगार हे 1 ते 5 तारखेदरम्यान होत असतात. या कालावधीत प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि निमसरकारी शाळा, सरकारी शाळांच्या शिक्षकांचे देखील पगार याच कालावधीत होत असतात.
सरकारच्या विविध योजनांवरील खर्चांमध्ये तरतुदी करण्यात येतेय. यात शिक्षकांच्या पगारासंदर्भात देखील तरतूद करण्यात आल्याची माहिती मिळतेय. यासाठी कागदपत्रांची देखील पूर्तता 15 तारखेपर्यंत होणं (Teachers Salary May Delay) आवश्यक आहे. त्यामुळेच नव्या वर्षात शिक्षकांचा पगार उशिरा येऊ शकतो. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार आल्यानं शिक्षकांच्या पगाराची तरतूद रखडली होती, असं सांगितलं जातंय.
धक्कादायक! तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती; पेट्रोल टाकून सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
शिक्षकांच्या पगाराची रक्कम नेहमी 15 तारखेपर्यंत वर्ग करण्यात येते. परंतु लाडक्या बहीण योजनेचा हप्ता द्यायचा असल्यामुळे उशीर झाल्याची माहिती मिळतेय. शिक्षकांचा पगार लवकरात लवकर व्हावा, यासाठी आता शिक्षण विभागाची धावपळ सुरू आहे.
सोलापूरमध्ये देखील 13 हजार शिक्षकांचा पगार रखडणार असल्याचं समोर येतंय. 13 हजार शिक्षकांच्या पगारासाठी जवळपास 90 कोटी रूपये लागत असल्याची माहिती मिळतेय. या पगाराची रक्कम 20 तारखेला वेतन अधीक्षकांना प्राप्त होते. परंतु 27 तारखेपर्यंत अजून शासनाकडून हे पगार जमा करण्यात आलेले नाहीत. पुढील तीन दिवस बॅंकांना सुट्टी आहे. त्यामुळे पगार जमा होण्यास उशीर होणार आहेत. त्यामुळे आता नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच शिक्षकांना पगार मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.