10 वर्षे निवडणुका झाल्या नाही अन्…, ठाकरेंच्या वकिलांनी चुकीचे मुद्दे मांडले; चव्हाणांचा मोठा दावा
Prithviraj Chavan On Shivsena UBT : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना चिन्हाच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांनी चुकीचे
Prithviraj Chavan On Shivsena UBT : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना चिन्हाच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांनी चुकीचे मुद्दे मांडले त्यामुळे या प्रकरणात पुढील सुनावणी जानेवारी 2026 मध्ये होणार असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. मगील सुनावणी दरम्यान फक्त एका मिनिटांमध्ये हा खटला संपला. ठाकरे गटाच्या वकिलांनी दहा वर्ष निवडणुका झाल्या नाही हा मुद्दा मांडला पाहिजे होता असं देखील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले की, शिवसेनेचा जो खटला झाला त्यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी पुन्हा एकदा चुकीचा युक्तीवाद केला. शिवसेनेच्या वकिलांनी चुकीचे मुद्दे मांडले. एकामिनिटामध्ये हा खटला संपला त्यामुळे त्यांनी आम्ही जानेवरीमध्ये ऐकतो असं म्हटलं म्हणजे सगळ्या निवडणुका संपल्यानंतर. मात्र आम्ही ज्या स्थानिक निवडणुका लढणार आहोत त्या दहा वर्षे झालेल्या नाहीत हा मुद्दा त्यांना मांडायला हवा होता.
तसेच भाजप (BJP) सरकारने 73 आणि 74 ची घटना दुरुस्ती मोडून काढलेले आहे हे देखील सांगायला हवं होतं आणि निवडणुका होण्यापूर्वी तुम्ही आम्हाला चिन्हाबाबत निर्णय द्या असंही म्हणायला हवं होतं पण ही बाजू मांडली गेलेली नाही असं माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
तर दुसरीकडे या प्रकरणात तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) करण्यात आली होती मात्र आता सर्वोच्च न्यायालायने या प्रकरणात पुढील सुनावणी जानेवारी 226 मध्ये ठेवली आहे.
देवेंद्र फडणवीस शॅडो मुख्यमंत्री, सर्व कारभार अमित शाह चालवतात; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका मशाल या चिन्हावर लढावे लागणार आहे.
