मालवण नगर परिषदेत एकमेकांना भिडले; आता निलेश राणे म्हणतात रवींद्र चव्हाण माझे मोठे भाऊ
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार निलेश राणे यांच्यातील वाद संपुष्टात; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोघांची मैत्रीपूर्ण भेट.
Nilesh Rane says Ravindra Chavan is his elder brother : नुकत्याच झालेल्या नगर पंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी आमदार निलेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने (Maharashtra) पहिला होता. या संघर्षाचा दुसरा पार्ट आता हिवाळी अधिवेशनाच्या वेळी पाहायला मिळाला. हा काही संघर्ष नव्हता, तर हा पार्ट होता या दोघांचा समेटाचा. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि निलेश राणे(Nilesh Rane) यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचं यावेळी पाहण्यात आलं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही भेट पाहायला मिळाली. इतकाच काय तर रवींद्र चव्हाण हे मला मोठ्या भावासारखे आहेत, असंही आमदार निलेश राणे यावेळी म्हणाले. त्यामुळे संपूर्ण राजकीय (Politics) वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे.
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात शिवसेनेचे (Shivsena) दोन आमदार असतानाही झिरो समजणाऱ्या भाजपला निवडणुकीत ताकद दाखवल्याचे वक्तव्य आमदार निलेश राणे यांनी केलं होतं. त्यांनी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेवर टीका केली होती. जिल्ह्यात तीन पैकी दोन आमदार असतानाही भहजपला नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत एक आणि दोन जागांची ऑफर देण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. इतकंच नाही तर शिवसेनेची जिल्ह्यात ताकदच नाही, हे सांगण्याचा रवींद्र चव्हाण यांनी केविलवाणा प्रयत्न केला, असंही ते म्हणाले होते.
ठाकरेंचे 20 आमदारही भाजपच्या गळाला… आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर
त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यानंतर एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून 25 लाख रुपये एका भाजप कार्यकर्त्याच्या घरात कसे आढळून आले? यावे देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ज्यानंतर हा संघर्ष अजून पेटल्याचं चित्र होतं. मात्र आज हिवाळी अधिवेशनात हा वाद संपुष्टात आल्याचं पाहायला मिळालं. या भेटीनंतर आमदार निलेश राणे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं, की मी आधीही सांगितलं होतं की, आमच्यात वाद वगैरे काही नव्हता. निवडणुकीचा विषय होता.
त्या त्या वेळी मी बोललो आहे. मी आधीही सांगितलं होतं की, रवींद्र चव्हाण आणि माझं कधीही शत्रुत्व नाही आणि कधीच नव्हतं. रवींद्र चव्हाण माझ्या मोठ्या भावाप्रमाणेच आहेत. मला रवींद्र चव्हाण यांनीच आज बोलावून घेतलं. ते ज्येष्ठ असून मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यामुळे मी जाऊन त्यांना भेटलो. मी तिसऱ्यांदा सांगतो की, रवींद्र चव्हाण हे मला मोठ्या भावाप्रमाणे आहेत, त्यांनी मला आशीर्वाद दिले. रवींद्र चव्हाण आणि माझ्यात कधी टोकाचा वाद झालाच नाही. निवडणुकीच्या काळात जे बोलायचं होतं, जे नजरेसमोर आलं त्याचे पुरावे मी निवडणूक आयोगासमोर दिले आहेत.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; कोणत्या नेत्याने कशी केली एन्ट्री? पाहा खास फोटो
भाजप किंवा रवींद्र चव्हाण यांच्याबाबत माझी वैयक्तिक अशी काहीच तक्रार नाही. मी रवींद्र चव्हाण यांचं नाव घेतलं आणि पुरावा दाखवला. तो पुरावा मी निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे. एका बोगस ओबीसी प्रमाणपत्रावर रीट पिटिशन दाखल केलं. त्याचा अहवाल आला की मी प्रतिक्रिया देईन. असं निलेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय.
