‘लोकांमध्ये सोडून तुडवून मारले पाहिजे’, बदलापूर एन्काऊंटरवर उदयनराजे भोसलेंची बेधडक प्रतिक्रिया
Udayanraje Bhosale On Badlapur Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये (Badlapur Encounter) मृत्यू झाला आहे. यानंतर राज्य सरकारवर विरोधक जोरदार टीका करत या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्यापेक्षा लोकांमध्ये सोडून तुडवून मारले पाहिजे अशी बेधडक प्रतिक्रिया दिली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की, त्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी कायद्यात बदल करा, बलात्कार केला की सरळ लोकांसमोर त्याला फासी द्या असं माध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सत्ताधारी असो किंवा विरोधक मला काही घेणेदेणे नाही. सत्ताधारी असू किंवा विरोधक जे कोणी असू दे यांच्या कुटूंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केले असते?असं बोलले असते का? ज्या मुलीच्या कुटुंबाला या परिस्थितीला सामोरे जावे लागले त्यांच्या कुटूंबाच्या जागेवर मी स्वतःला ठेवून मी बोलतो मारणे हे अतिशय सहज झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे जनता त्यांना तुडवून मारले पाहिजे असं देखील माध्यमांशी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
Coldplay तुफान क्रेझ अन् ‘बुक माय शो’ ची थेट पोलिसात धाव
23 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्याने मुंब्रा बायपास परिसरात पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर दोन गोळ्या झाडले त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर तीन गोळ्या झाडले आणि यात त्याचा मृत्यू झाला.
तर पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेतील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच मयत आरोपीच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.