फडणवीस भाजपची परंपरा चालवतील अशी अपेक्षा होती पण…, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात आज संपूर्ण राज्यात शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena UBT) आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. साधू संतांचा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणारा गौरवशाली महाराष्ट्र, भ्रष्टाचाराच्या पाहिल्या रांगेत महायुती सरकारने बसवला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी बोलताना केली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मर्द आपल्या शिवसेनेत आहे. बिन डोक्याच्या लोकांना फक्त पाय आहे. सुरत आणि गुवाहाटीला पळून जायला. त्यांना डोकं नाही, डोक्याच्या जागी खोके आहे असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लावला.
तर जुलुमशाही विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल. साधू संतांचा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणारा गौरवशाली महाराष्ट्र, भ्रष्टाचाराच्या पाहिल्या रांगेत बसवलं आहे. आतापर्यंत भ्रष्टाचार झालेल्या आरोप झाले तर मंत्राचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशी केली जाते. मी मुख्यमंत्री असताना एकाचा राजीनामा घेतला, तो मंत्री अत्यंत वाईट वागत होता. तो वनमंत्री होता, त्याला आपण वनवासात पाठवले. पण आताचं सरकार जनताभिमूख नाही तर पैसे गिळणारं आहे.
आमच्या परबांनी पुराव्यानिशी राज्यगृहमंत्री बार चालवतोय हे दाखवून दिले. असं मुंबईत बोलताना उद्धव ठाकेर म्हणाले. तर रम्मीमंत्र्याला आता अवडीचं खातं मिळाले आहे. शेतकऱ्यांची थट्टा करता, सभागृहात रम्मी खेळता. देवेंद्र फडणवीस भाजपची परंपरा चालवतील अशी अपेक्षा होती पण मुख्यमंत्री सांगतात आम्ही समज दिली.
राज्य कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ
समज कसली तर रम्मी नको तर तीन पत्ती खेळा. भ्रष्टाचारांना पुरावे देऊन सोडलं तर उपराष्ट्रपतींना का समज दिली नाही? धनखड कुठे आहेत, त्यांना समज देऊन का सोडलं नाही? असा सवाल देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.