Video : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील अडीच वर्षांनी बदलणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल

Video : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील अडीच वर्षांनी बदलणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray Critized Devendra Fadanvis : राज्यात 14 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. यामध्ये मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीतील अनेक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर आता उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) हल्लाबोल केलाय. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, विजयाच्या फटाक्यांपेक्षा नाराजीचे बार अधिक वाजले. मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा अधिक आहे.

लाकडी बहीण योजना तातडीने सुरू करा, अशी मागणी करण्याबरोबरच ठाकरेंनी आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रूपयांनी थकीत पैसे देण्याचीही मागणी केली आहे. तसेच लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शनचं विधेयक सादर केलं गेलंय. यावर ठाकरे म्हणाले की, (Devendra Fadanvis Cabinet Expansion) दिशा भरकवण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय. निवडणूक आयुक्त हे देखील निवडणुकीतून निवडले गेले पाहिजे. वन नेशन वन इलेक्शन ही प्रक्रिया मान्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. एका साध्या गावात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला का घाबरता असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेनं बहुमत दिलं का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

लोकशाहीमध्ये मी माझं मत कोणाला देतोय, हे समजलं पाहिजे. तो अधिकार आता हरवला जात आहे. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देखील अडीच वर्षांनी बदलणार का? असा सवाल देखील ठाकरेंनी केलाय. की केवळ मंत्रीपद बदलून आपल्या खुर्च्या बळकट करणार आहात आणि बाकीच्यांना खेळवणार आहात, असं देखील उद्धव ठाकरे यांनी विचारलं आहे. एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, लोकांचा गैरसमज दुर करा असं ते म्हणाले आहेत.  भुजबळ अजून संपर्कात नाहीत, परंतु अधूनमधून त्यांच्याशी संपर्क होत असतो, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मी अजित पवारांच्या हातातील खेळणं आहे का?; खडेबोल सुनावतं नाराज भुजबळ कडाडले…

तसेच इकडे मंत्रिपदावरून जितकी खळखळ आहे, तितकी इंडिया आघाडीत नाही. नागपूर ही होर्डिंग नगरी झालीय. आपला दादा, भाऊ, कर्णधार कोण? यामध्ये सगळे एकमेकांचा वापर करून घेत आहेत. अनेक नाराज असलेले लोक संपर्कात असल्याचे निरोप येत आहेत. अनुभवाच्या गुरूने त्यांना धडे घेवू द्या, त्यानंतर ते सुधारलेत तर बघू असे संकेत देखील उद्धव ठाकरे यांनी दिलेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube