सावध व्हा! घराबाहेर पडताना विचार करा, ‘या’ भागांत सूर्य ओकतोय आग; तापमानात वाढ

सावध व्हा! घराबाहेर पडताना विचार करा, ‘या’ भागांत सूर्य ओकतोय आग; तापमानात वाढ

Maharashtra Weather News : राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. एप्रिल महिन्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी तर सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. या कडाक्याच्या उन्हाने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. पश्चिम राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छमधील काही भागांत उष्णता प्रचंड वाढली आहे. राजस्थानच्या सीमाभागात तापमाना 45 अंशांच्याही पुढे गेले आहे. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याठिकाणी तापमान 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. चंद्रपुरात 43.6 तापमान होते. हिंगोली आणि परभणीत तापमान 41 अंशांवर पोहोचले आहे.

हवामान विभागाने राज्यातील उष्णतेच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणाला उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतही चित्र वेगळी नसून येथे दमट हवामानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होते. त्यामुळे आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.

काळजी घ्या! राज्यात उष्णतेच्या लाटा येणार; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

खासगी हवामान संस्था स्कायमेटनुसार पाकिस्तानच्या दक्षिण भागात आणि मध्य भागांत उकाडा प्रचंड वाढला आहे. त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रात दिसून येत आहे. सिंध प्रांतातील हैदराबादेत 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नवाबशाहमध्ये 47 अंश, सिबीमध्ये 46 अंश तापमान नोंदवण्यात आले. या भागातून उष्ण वारे गुजरात आणि राजस्थानात येत आहेत. परिणामी येथे तापमानात वाढ झाली आहे. याचाही परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे. पुढील काही दिवस उष्णतेत वाढ होईल असा इशारा देण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात उष्णता वाढणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या काळात देशातील बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान जास्त राहील. राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा येतील अशी स्थिती आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील तापमान जास्त राहणार आहे असा इशारा देण्यात आला आहे. मार्च महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेचा त्रास फारसा जाणवला नाही. परंतु, आता एप्रिल महिना  सुरू झाला असून तापमानात रोजच वाढ होताना दिसत आहे.

आला उन्हाळा प्रकृती सांभाळा! उन्हाळ्यात उष्णतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी खा हे सुपरफुड!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube