उमेदवारी मिळताच नवनीत राणांनी सोडला नवऱ्याचा पक्ष : रातोरात झाल्या ‘अधिकृत’ भाजपवासी

उमेदवारी मिळताच नवनीत राणांनी सोडला नवऱ्याचा पक्ष : रातोरात झाल्या ‘अधिकृत’ भाजपवासी

अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती (Amravati) मतदारसंघातून भाजपकडून (BJP) विद्यमान अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी झाली आहे. त्यानंतर राणा यांनी त्यांच्या पतीचा म्हणजेच आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काल (27 मार्च) रात्री उशीरा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये छोटेखानी पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Navneet Rana has ‘officially’ entered the BJP as soon as he got the nomination)

भाजपमध्ये प्रवेश करताना नवनीत राणा म्हणाल्या, “गेली पाच वर्षे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर काम करत होते, माझी विचारधारा वेगळी नव्हती. माझे पती आमदार रवी राणा यांनीही महाराष्ट्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदी काम करणाऱ्यांना पाठिंबा देतात. ग्राउंड लेव्हलवर त्यांनी मला तिकीट दिले आहे. भाजपने माझ्या मेहनतीचा कौल दिला आहे. आता निवडणूक जिंकून आम्ही 400 चा आकडा पार करण्याचा संकल्प पूर्ण करू. मी भाजपची एक समर्पित कार्यकर्ता म्हणून काम करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले.

अमरावतीमधून राणांना तिकीट जाहीर :

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांना तिकीट मिळाले आहे. मात्र राणा यांचा प्रचार करण्यासाठी आमदार बच्चू कडू आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नकार दिला होता. पण या सगळ्यांनाच गाफील ठेवत राणा यांनी बाजी मारली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात भाजपला मिळाले ‘बॉस’ : UP मधील बाहुबली नेते नवे इन’चार्ज

बच्चू कडूंचा इशारा :

राणा यांच्या उमेदवारीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, राणाने घरात घूसून मारण्याची भाषा केली होती, आम्ही गुवाहाटीला खोके घेऊन गेलो असे ते म्हणाले होते. सरकार म्हणून फडणवीस फोन करतात पण अमरावतीच्या तिकीटाच्या वेळी फोन करीत नाही. आम्ही आमची भूमिका भाजपसमोर मांडली होती, मात्र भाजपकडून राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना मिळालेल्या उमेदवारीचा आम्ही ठामपणे विरोध करणार असून एकतर उमेदवार उभा करु नाहीतर या वेळेचा निकाल आम्ही नक्कीच देणार असल्याचं बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज