विभाजन नको हे विखेंचं मत पण जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी… विभाजनावर राम शिंदे ठाम

Vikhe’s opinion no division, but Ram Shinde firm on division : विधान परिषदेचे सभापती झाल्यानंतर पहिल्यांदाच प्राध्यापक शिंदे यांनी अहिल्यानगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निलम गोऱ्हेंच्या वक्तव्यापासून ते अहिल्यानगर जिल्हा विभाजनापर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी विभाजनावर ते ठाम असल्याचं पाहायाला मिळालं.
पिठासीन अधिकाऱ्यांनी मर्यादा पाळणे गरजेचे; सभापती शिंदेंचा उपसभापती गोऱ्हेंना सल्ला
दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा विभाजन होणार नसल्याचे भाष्य केले आहे व त्यावर बोलताना प्राध्यापक शिंदे म्हणाले, ते त्यांचे मत असू शकेल मात्र जिल्हा विभाजनाबाबत सभागृहात विषय उपस्थित झाला तर त्या चर्चेला कशी कलाटणी देता येईल हे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहील असे सूचक भाष्यही त्यांनी केले.
144 लावा नाहीतर 145, जीवाला धोका झाला तर गाठ मराठ्यांसोबत, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
विधान परिषदेचे सभापती झाल्यानंतर पहिल्यांदाच प्राध्यापक शिंदे यांनी नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेश पदाधिकारी प्राध्यापक भानूदास बेरड, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर सरचिटणीस सचिन पारखी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राध्यापक शिंदे यांनी मी विधान परिषदेचा सभापती असल्याने व ते पद संवैधानिक असल्याने मत व्यक्त करण्यावर मर्यादा असल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे मढी ग्रामस्थ मुस्लिम व्यावसायिक बंदी ठराव, नगरचा बिहार झाल्याच्या खा. लंके यांच्या दाव्यावर मत व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.
येत्या तीन मार्चपासून सुरू होणाऱ्या बजेट अधिवेशनात सभापती म्हणून प्रत्यक्ष कामाचा अनुभव मी घेणार आहे, असे स्पष्ट करून आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सुनावणी झाली आहे व त्यांना वेळ वाढवून दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.