अहमदनगर : भारतातील अग्निवीर जवानांच्या पहिल्या बॅचचे सैनिकी प्रशिक्षण अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर अँड स्कूलमध्ये (एसीसी अँड एस) सुरु झाले आहे. जवानांना येथे सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण मिळणार आहे. अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर अँड स्कूलच्या अंतर्गत औरंगाबाद रस्त्यावरील बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट आणि जामखेड रस्त्यावरील अमेमेंट इलेक्ट्रॉनिक रेजिमेंट या दोन विभागात हे प्रशिक्षण सुरू […]
कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटकात झालेल्या विचारवंतांच्या हत्येमुळे सारा देश हादरला होता. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंताच्या हत्या झाल्या होत्या. यातील ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील १० आरोपींवर दोष निश्चिती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयासमोर सोमवारी ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी […]
अहमदनगर : जिल्ह्यासह मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दोन दिवस थंडीची लाट राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट पाहता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व पुणे जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात […]
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृत सागर दूध संघाची निवडणूक आज झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला धूळ चारत माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनलने विजय मिळविला. त्यांच्या पॅनलने 15 पैकी 13 जागांवर विजय मिळविला. मागील वर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना व राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना चाळीस वर्षांची सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे अमृत सागर […]
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदानं पदरात दुःखच पडल्याचं वक्तव्य केलंय. त्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर टिपण्णी केलीय. पवार म्हणाले, ते दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत, अशी प्रतिक्रीया दिलीय. आज रविवारी (दि.8) ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर […]