मुंबई : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण (Koyna Dam) अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा 1923 (Government Secrets Act 1923) मध्ये आंशिक सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूचा 7 किमीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित जलाशयाचा 80 किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या […]
अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी (7 ऑक्टोबर) दुपारी शाळेतून परत येत असताना रासने नगर जवळ त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी आज (9 ऑक्टोबर) या हल्ल्याबाबतची माहिती माध्यमांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली. […]
Solapur News : नांदेडमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंज मळाळे यांनी त्यांच्या स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. मळाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. मात्र, सध्या नांदेड येथे कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसले तरी कामाच्या ताणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे खरे […]
Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या पक्षातील नेत्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर काही दिवसांतच खुद्द अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर गेले. या घडामोडींनंतर भाजपवरच टीका केली जाऊ लागली. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सोबत […]
Anna Hazare : ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे (Anna Hazare) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. त्याला कारणही तसेच आहे. आज सकाळी आव्हाड यांनी अण्णा हजारे यांचा फोटो ट्विट करून त्यांच्यावर जोरदार टीका केली. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, असं म्हणत त्यांनी टीका केली होती. आता अण्णा हजारेंनी त्यांच्या ट्विटला […]
Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण (Kolhapur Politics) म्हटलं की समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यातील राजकीय संघर्ष कोल्हापुरातील जनतेसाठी नवा नाही. आताही मुश्रीफ भाजपबरोबर आले, कोल्हापूरचं पालकमंत्रीपदही मिळवलं तरी देखील दोन्ही नेत्यांतील संघर्ष कमी झाला नाही. आताही दोघांतील संघर्षात वाढ होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपाच्या मेहेरबानीमुळे पालकमंत्रीपद […]