लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; व्यवसायासाठी कर्ज मिळणार, हप्ते फेडण्यासाठीही सवलत
या योजनेतंर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा देण्यात येतात. हे पैसे DBTअंतर्गत थेट त्यांच्या खात्यात जमा होतात.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana) लाडक्या बहिणींना निकषांना आणि ई-केवायसीला सामोरे जावं लागत असलं तरी सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठं पाऊल टाकलं आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे. त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई आणि जवळपासच्या क्षेत्रात त्याची अंमलबजावणी होत असताना राज्यातही लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती. या योजनेतंर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा देण्यात येतात. हे पैसे DBTअंतर्गत थेट त्यांच्या खात्यात जमा होतात. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. ग्रामीण भागातील महिलांना त्याचा लाभ मिळत आहे. तर, इतर काही योजनांचा फायदा घेणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणार नसल्याचे सरकारने अगोदरच स्पष्ट केलेलं आहे.
ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे; राज्यात रात्रभर मुसळधार पाऊस, या जिल्ह्यात रेड अलर्ट
या योजनेत महिलांना व्यवसायासाठी आता 1 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे. महिलांना 0 टक्के व्याजदराने हा कर्ज पुरवठा केला जाऊ शकतो. मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली आहे. या योजनेत 1 लाखांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्यात येत आहे. सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करता येणार आहे. त्यांना एकत्र येऊन व्यवसाय करण्याची संधी आहे.
लाडकी बहिण योजनामध्ये महिलांना प्रती माह 1500 रुपये अनुदान दिले जाते. लवकरच हे अनुदान 2100 रुपये करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पण त्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. या मिळणाऱ्या अनुदानातून कर्जाचे हफ्ते वसूल केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलनुसार, योजनेसाठी 1,12,70,261 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. तर 1,06,69,139 अर्ज मंजूर झाले आहेत.