Badlapur : बदलापुरचा नराधम पुरता अडकला! वकील संघटनेकडून मोठा निर्णय…
Badlapur Rape Case : ठाण्यातील बदलापुरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार (Badlapur Rape Case) झाल्याची घटना घडल्याचं समोर आलं. या घटनेविरोधात बदलापुरकरांनी काल तब्बल 11 तास रेल्वे स्थानकावर निदर्शन केलीयं. तर आजही मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरु आहेत. अशातच आता चिमुकल्या मुलींना न्याय देण्यासाठी कल्याण वकील संघटनेकडून मोठा निर्णय घेण्यात आलायं. अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र घेण्यास वकीलांनी नकार दिलायं. त्यामुळे आता हा नराधम पुरता अडकल्याचं बोललं जात आहे.
मला माझ्या वकिल संघटनेचा अभिमान आहे… नराधमाला वकिल मिळणार नाही. pic.twitter.com/N8D3dWN1c9
— Adv.Jayesh Wani – अॅड.जयेश वाणी (@jayeshwani) August 20, 2024
अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा न्यायालयात बचाव करणार नाही. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलिस कोठडीत वाढ करुन 26 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलीयं. आरोपीला आज सकाळी पोलिस बंदोबस्तात कल्याणच्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिलेत.
Video : सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचं पालन करावं; बदलापूर घटनेवरून राऊत न्यायलयावर संतापले
दरम्यान, बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवरील अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिक कमालीचे संतापले होते. काल त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानक आणि संबंधित शाळेबाहेर जोरदार आंदोलन केले. काही वेळानंतर मात्र या आंदोलनांना हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आंदोलकांनी ऐकलं नाही. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा करण्यात आला. यानंतर चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केली.
तर या घटनेच्या निषेधार्थ काल बदलापुरकरांनी रेल्वे स्थानकावर तब्बल 11 तास चक्का जाम आंदोलन केलं. संबंधित आरोपीला तत्काळ फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलन निवळलं. बदलापुरकरांनंतर आज काँग्रेस नेत्यांनी या घटनेचा निषेध केलायं. या आंदोलानामध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते.