मुंबईत पैशांचं घबाड! नाकाबंदीत व्हॅनमध्ये सापडले 4 कोटी 70 लाख…
Cash Seized in Mumbai : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण पेटलेलं असतानाच राज्यातील अनेक ठिकाणी गाड्यांच्या तपासणीत रोकड सापडल्याचं उघडकीस येत आहे. अशातच आता मुंबईत पैशांचं घबाड सापडलं आहे. मुंबईतील पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्हॅनमध्ये 4 कोटी 70 लाख रुपयांची रोकड (Cash Seized in Mumbai) पोलिसांनी पकडलीयं. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडालीयं.
राहुल गांधींच्या गाईडकडून देशवासीयांचा अपमान; पित्रोदांच्या वर्णभेदी वक्तव्याचा मोदींकडून समाचार
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध जिल्ह्यांत पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. नाकाबंदी करुन पोलिसांकडून सर्वच गाड्यांची तपासणी केली जात आहे. या तपासणीदरम्यान, परवा (दि. 6) रोजी गार्डन बीट चौकीजवळ पोलिसांकडून गाड्यांची तपासणी सुरु असताना एक व्हॅन रोकड घेऊन जात असताना आढळून आली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर 4 कोटी 70 लाख रुपयांसह व्हॅन ताब्यात घेतली.
ST Bank प्रकरणी सदावर्ते दाम्पत्याला झटका! सहकार खात्याकडून दोघांचंही संचालकपद रद्द
या प्रकरणाची माहिती पोलिसांनी आयकर विभागासह निवडणूक कार्यालयातही दिली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी रोकडचा बारकोड स्कॅन केल्यानंतर तो मिसमॅच झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर आयकर विभागाने रोकड आणि व्हॅन आपल्या ताब्यात घेत ही रोकड कुठून आणलीयं, एटीएममध्ये भरण्यासाठी जात होते की निवडणूकीत रोकडचा वापर होणार होता? या अॅंगलने तपास आयकर विभाग करीत आहे.
धक्कादायक! ईव्हीएम हॅकींगसाठी दानवेंना अडीच कोटी मागितले; पुण्यातून एक जण ताब्यात
दरम्यान, मुंबईतील अनेक भागांत याआधीही गाड्यांमध्ये रोकड आढळून आल्याचे प्रकार समोर आले आहेत. मुंबईतील घाटकोपर, भांडूप, सायन, भागातही पोलिसांना रोकड असलेल्या गाड्या मिळालेल्या आहेत. सायनमध्ये 1 कोटी 87 लाख 80 हजार तर भांडूपमध्ये 3 कोटी 93 लाखांपेक्षा जास्त संशयित रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आलीयं.