Video : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले, फडणवीसांनी वाचली यादी

Video : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले, फडणवीसांनी वाचली यादी

Devendra Fadanvis : विरोधकांनी आधीच प्रतिक्रिया ठरवलेली होती, फक्त बजेट सादर करण्याची वाट पाहत असल्याची खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी केलीयं. दरम्यान, केंद्र सरकारकडून आज संसदेत यंदाच्या वर्षीचं बजेट सादर करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर केल्यानंतर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. या टीकांवर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत अर्थसंकल्पातून राज्याला काय काय मिळाले आहे याची यादीच फडवीसांनी वाचून दाखवली आहे.

नागरिकांची पिळवणूक अन् गुंडांची पाठराखण…पोलीस प्रशासनावर कळमकरांचा संताप

देवेंद्र फडणवीस म्हणाले, इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सकाळीच प्रतिक्रिया ठरवलेली होती, आधीच ट्विट करुन ठेवलं होतं, फक्त बजेट सादर होण्याचा उशिर होता. विरोधकांच्या अशा प्रतिक्रियांमुळे आमचं एंटरटेनमेंट होतं. विजय वडेट्टीवारांनी अर्थसंकल्पाचं स्वागत करायला हवं.
केंद्राला धन्यवाद द्यायला हवं पण त्यांच्याकडे खटाखट होतं. ज्या राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे तिथं तरी खटाखट दाखवा. केंद्रात आपली सत्ता येत नाही म्हणून ते असा नरेटिव्ह तयार करीत असल्याचं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

शेतीचं बजेट! दीड लाख कोटींची तरतूद अन् शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म; बजेटमध्ये घोषणा

तसेच विरोधकांना अधिकृत बजेटची कॉपी दिली तरीही ते वाचत नाही तर ते माझी कॉपी काय वाचतील, त्यांची प्रत्येकाची प्रतिक्रिया ठरलीयं
ते फक्त नरेटिव्ह सेट करतील. प्रत्येक बजेटला एक थीम असते ही थीम पूर्व किनारपट्टी अशी थीम आहे. त्यामुळे काही राज्यांना निधी देण्यात आलायं. चिदंबरम साहेबांनी बजेटचं स्वागत केलं पाहिजे, जी राज्ये आहेत त्या राज्यांमध्ये अद्याप खटाखट सुरु झालेलं नाही. कमीत कमी त्या राज्यांमध्ये तरी खटाखट सुरु करा, असा खोचक सल्लाही फडणवीस यांनी दिलायं.

फडणवीसांच्या बुद्धीची किव येते, त्यांनीच पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेलं आरक्षण टिकवलं नाही; पटोलेंचा पलटवार

दरम्यान, केंद्राने आज अर्थसंकल्प सादर केलायं. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अतिशय संतुलित अर्थसंकल्प मांडलायं. कोविडनंतर जगातल्या अर्थव्यवस्था कोलमडल्या होत्या. अनेक देश अर्थव्यवस्थेशी झुंजत होते, अशात अर्थव्यवस्थेत 8.2 टक्क्याने वाढली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

अर्थसंकल्पातून राज्याला काय काय मिळाले?

– विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
– महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
– सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
– पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
– महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
– MUTP-3 : 908 कोटी
– मुंबई मेट्रो: 1087 कोटी
– दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
– MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
– नागपूर मेट्रो: 683 कोटी
– नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
– पुणे मेट्रो: 814 कोटी
– मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube