Video : बीअर, रम, जिन बकवास…; नशामुक्ती अभियानात नाईकांची फडणवीसांसमोर तुफान बॅटिंग
Forest Minister Ganesh Naik Speech At Nashamukt Navi Mumbai : नवी मुंबई पोलीस यांच्या अंतर्गत नशामुक्त नवी मुंबई (Nashamukt Navi Mumbai) अभियान प्रारंभ पार पडला. या कार्यक्रमाला सिनेअभिनेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) देखील उपस्थित होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तुफान बॅटिंग केलीय. गणेश नाईक म्हणाले की, कधी कधी काळाची गरज निर्माण होते. कालानुरूप काही गोष्टींची गरज भागवली जाते. त्या-त्या परिस्थितीत काही ठिकाणी काही लोक हतबल असतात. सुदैवाने देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची रिजल्ट ओरिऐंटेड सुरूवात झालीय.
शरद पवारांची राष्ट्रवादी फुटणार? तटकरेंची ऑफर काय.., आव्हाडांनी क्लिअरच केलं
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, नेताच जर चुकीचा असेल तर सगळी यंत्रणा त्याच मार्गाने जाते. हा माझा अनुभव आहे. शिंदेंच्या काळात देखील काही गोष्टी चुकीच्या घडल्या, त्यांची इच्छा नसताना. परंतु ती परिस्थिती बदलली (Navi Mumbai Police Project) आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला मंत्रिमंडळाने पाठिंबा दिलाय, असं नाईक यांनी स्पष्ट केलंय.
नाईक म्हणाले की मुख्य मुद्दा नशामुक्तीचा आहे. आम्ही कॉलेजला होतो, त्यावेळी एखाद्या सहकाऱ्याला सिगारेट ओढायचं असल्यास कुठेतरी अंधारात जावून लपून छपून घ्यावं लागायचं. आता कॉलेजच्या बाहेर सर्व मिळतं. त्यावेळी फक्त तरूणच होते, आजच्या तरूणी देखील मागे राहिलेल्या नाहीत. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वत:वर अधिक बंधन घातली पाहिजेत. जेणेकरून नशामुक्ती म्हणजे काय? दहा वर्ष मी दारू पिण्याच्या खात्याचा मंत्री होतो. या खात्याची प्रगती सांगणं म्हणजे दुषण लावून घेण्यासारखं आहे.
धक्कादायक! पुण्यात मित्रानेच तरूणीला संपवलं, कोयत्याने केले सपासप वार
माणसाने मनाशी बाळगलेली ध्येय पूर्ण करताना जी नशा येते, ती खरा नशी. या नशा सिगारेट, रम, दारू, जिन बकवास आहेत, असं नाईक म्हणालेत. नवी मुंबई पोलिसांच्या प्रयत्नातून सुरू झालेलं नशामु्क्त अभियान हे नक्की यशस्वी होईल, यात शंका नाही असं गणेश नाईक यांनी स्पष्ट केलंय. आपली एपीएमसीत भाज्यांच्या ट्रकमधून नशेचे पदार्थ येत असतात. तिथे एक व्यक्ती नेमलाय, त्याच्या माध्यमातून हे पदार्थ पकडले जात आहेत. लवकरच आपण नशामुक्त नवी मुंबई करू, असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केलंय.