अहमदनगर : मला कोणत्याही पक्षात अडकायचं नसल्याचं नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमदेवार सत्यजित तांबे यांनी एका ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना स्पष्ट केलंय. तसेच मी वादळ शांत होण्याची वाट बघतोय, माझी भूमिक लवकरच मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सत्यजित तांबे आणि जळगावच्या एका मतदारामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या क्लिपमध्ये सत्यजित तांबे यांनी लवकरच माझी […]
मुंबई : सर्वसामान्य जनता महागाईच्या ओझ्याखाली दबलेला आहे. अशातच आता माहागाईनं त्रस्त लोकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरांत उसळी पाहायला मिळत आहे. आज (दि.17) दुपारी 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 245 रुपयांवर जाऊन पोहोचलाय. सोन्याच्या दरांनी 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडल्याचं पाहायला मिळतंय. नवीन वर्षाची सुरुवात माहागाईनं झालीय. एकीकडं मंदीचं सावट असतानाच […]
अहमदनगर : श्रीरामपूर शहर पोलीसांनी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्द दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधितज्ञ डी. आर.मरकड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मधील एका जुन्या गुन्हयातून डॉ. विजय मकासरे यांचे नांव वगळण्यासाठी पोलीस स्टेशन मधील पोलीसांनी लाचेची मागणी […]
अकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावती एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी अकोल्यातून अमरावतीसाठी रवाना झाले आहेत. त्याआधी नितीन देशमुखांनी मोठं शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलं. यावेळी देशमुख यांच्या पत्नीनं त्यांचं औक्षण केलं. आपल्याला अचानक अटक झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी आपली कपड्यांची बॅग भरुन नेली आहे. याची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. […]
मुंबई : राज्यभरात थंडीचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय. विविध जिल्ह्यांत पारा घसरल्यानं हुडहुडी भरल्याचं पाहायला मिळतंय. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्यात. अनेक जिल्ह्यात 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झालीय. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाक्यात वाढ झाली आहे. मुंबईतही थंडी वाढल्याचं पाहायला मिळतंय. काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याचं दिसून येतंय. राज्यात […]
जालना : जालन्याच्या आमदाराला अर्जुन खोतकर नावाची कावीळ झाली आहे. अशा शब्दात अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. दरम्यान यावर बोलताना खोतकर म्हणाले, जिल्ह्यात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून अंदाजे 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यामध्ये या महाशयाला काही भेटले आहे का, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी पोलिसांकडे करणार असल्याचं खोतकर […]