भाजपचे सुनील मेंढे यांना 1 लाख 72 हजार 790 मते मिळाली असून दीड हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
संजय देशमुख यांनी आतापर्यंत 2 लाख 19 हजार 253 मते मिळाली असून त्यांनी 36 हजार 763 मतांना आघाडी घेतली.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पश्चिम महाराष्ट्रातील माढा, माळशिरस, शिरुर, हातकणंगले, बारामती आणि कोल्हापुरात महाविकास आघाडीचाच डंका असल्याचं दिसून येतंय.
राज्यातील मतमोजणीमध्ये सकाळी 12 वाजेपर्यंत महाविकास आघाडीला 28 ठिकाणी आघाडी मिळाल्याचं चित्र होतं. तर महायुती 20 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
लोकसभा निकालामध्ये बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचे खैरे आणि जलील यांच्यात टक्कर आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी भाजपला जोरदार धक्का देताना दिसत आहे.