ठाकरेंचे दोन खासदार मोदींना पाठिंबा देणार? CM शिंदेंच्या खासदाराच्या दाव्याने खळबळ!
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची मोठी पिछेहाट झाली. यात भाजपला सर्वाधिक फटका बसला. भाजपला यंदा दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. त्याखालोखाल शिंदे गटानेही 15 पैकी 7 जागा जिंकण्यात यश मिळवलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच खासदार निवडून आणता आला. या मोठ्या पराभवामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे तर महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुका ताकदीने जिंकण्यांच प्लॅनिंग करू लागली आहे. यातच आता महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवणारा दावा एकनाथ शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत, असा दावा म्हस्के यांनी केला आहे.
ठाणे नरेश महस्केंसाठी टफ? भाजप पदाधिकाऱ्यांकडून राजीनाम्याचे हत्यार, मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार पूर्ण बहुमतानं आलं आहे. आता हे सरकार पाच वर्ष व्यवस्थित कारभार करणार आहे. ठाकरे गटातील निवडून आलेल्या दोन खासदारांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आहे. जर हे दोन खासदार आले तर ते अपात्र होऊ शकतात. त्यामुळे खासदारांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचं सरकार येणार आहे. त्यामुळे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यायला तयार आहेत, असा दावा नरेश म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाला चुकीच्या पद्धतीनं मतदान झालं. पक्षाचे आमदार आणि खासदार श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद मिळावं अशी मागणी करत आहे. श्रीकांत शिंदे तीन वेळचे खासदार आहेत. तसेच त्यांना संसदरत्न पुरस्कारही मिळाला आहे. संघटनेच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. जर त्यांना मंत्री केलं तर संघटनेसाठी ही फायद्याची गोष्ट ठरेल. त्यामुळे श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद मिळावं अशी मागणी आम्ही करत आहोत असे म्हस्के म्हणाले.
मोदींच्या शपथविधी पूर्वीच शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंना मोठी जबाबदारी, दिसणार नवीन भूमिकेत
राऊतांना रोज शरद पवारांचा फोन
ठाणे मतदारसंघात मला साडेसात लाख मतं मिळाली यावरून स्पष्ट होत आहे की जनता आमच्याबरोबर आहे. सरकार पडणार असं संजय राऊत मागील दोन वर्षांपासून सांगत आहेत. ते सकाळी उठल्यानंतर त्यांना लगेच शरद पवारांचा फोन येतो. नंतर संजय राऊत शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करतात. राऊत सध्या पेरोलवर आहेत. त्यांना आता चांगल्या मनोविकार तज्ज्ञाची गरज आहे, असा खोचक टोला म्हस्केंनी राऊतांना लगावला.