मुंबईत हिट अँड रन! रिक्षाचालकावर कार घातली; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
Mumbai Accident News : भरधाव वेगात कार चालवून निष्पाप नागरिकांचा बळी घेण्याचे प्रकार (Mumbai Accident) राज्यात वाढीस लागले आहेत. हिट अँड रनच्या घटना (Hit and Run) थांबण्याचे नावच घेत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आताही अशीच (Road Accident) थरारक घटना मुंबईत घडली आहे. वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारने चिरडले. या धक्कादायक घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी नागपूरचे रहिवासी असल्याची माहिती आहे.
Pune Porsche accident मध्ये आमदार टिंगरेंना अभय; चार तास चौकशी पण चार्जशीटमध्ये नाव नाही
या आरोपींनी मद्यपान केले होते का याची तपासणी करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याबाबत आधिक माहिती अशी, रिक्षाचालक गणेश यादव आणि त्यांचा सहकारी बबलू श्रीवास्तव वर्सोवा समुद्र किनारी झोपले होते. याचवेळी भरधाव वेगातील कारने त्यांना चिरडलं. या अपघातात रिक्षाचालक गणेश यादव यांचा जागीच मृत्यू झाला तर बबलू श्रीवास्तव गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर एसयूव्ही कारमधील दोघेही जण पळून गेले होते. मात्र पोलिसांनी अपघातातील आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी मद्यपान केले होते का याची तपासणी करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
येथील स्थानिक नागरिकांपैकी एकाने त्याच्या मोबाइलवर कारचा फोटो काढला. यात कारची नंबर प्लेट दिसत होती. यामुळे वर्सोवा पोलिसांना तीन तासांच्या आत आरोपींचा शोध घेता आला. दोघा आरोपींनी ही कार कॅब व्यवसायासाठी भाडोत्री घेतली होती. दोघा जणांनी एका ग्राहकाला सोडून मुंबई गाठली. येथील समुद्र किनारी आल्यानंतर अपघाताची ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भीषण अपघात! कारची ट्रकला धडक; धुळे-सोलापूर महामार्गावर एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
दरम्यान, रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.