Devendra Fadnavis : शिवसेनेतील शिंदे गटाने भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. दुसरीकडे वर्षभरानंतर अजित पवार गटही सरकारमध्ये सामील झाला. सरकार व्यवस्थित चाललं असताना अजितदादांना सामावून घेण्याची काहीच गरज नव्हती असा सूर त्यावेळी होता. शिंदे गटाने नाराजीही व्यक्त केली होती. परंतु, आता लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) अगदी जवळ आलेल्या असताना भाजपने […]
Gautam Navlakha : एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आणि माओाद्यांशी संबंध असल्याच्या कारणाने नजरकैदेत असलेले गौतम नवलखा (Gautam Navlakha) यांना काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या स्थगितीच्या मागणीनंतर उच्च न्यायालयाने या निर्णयाला तीन आठवड्यांची स्थिगिती दिली. दरम्यान, अशातच आज (शनिवार) पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) काही […]
Task fraud : सध्या ऑनलाईन जॉबचे (Task fraud) अमिष दाखवून अनेक फसवणुकीची प्रकरण समोर येत आहेत. असाच प्रकार मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली होती की, त्याला अज्ञात लोकांनी ऑनलाईन नोकरीचं अमिष दाखवत फसवणूक केली आहे. आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिलं तुम्ही पडाल, संजय राऊतांचा […]
Mumbai : मुंबईकरांना (Mumbai) नवीन वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे. कारण मालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ करण्यात आली नाही. असं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त इकबाल सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील तेवढाच मालमत्ता कर मुंबईकरांना भरावा लागणार आहे. त्यामध्ये कोणतीही अतिरिक्त वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत मुंबईकरांनी कोणताही संभ्रम बाळगू नये […]
Sanjay Raut Criticized BJP on Ram Mandir : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे (Lok Sabha Election 2024) वाहत आहेत. राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असली जागावाटप अद्याप झालेलं नाही. जागावाटपावरून विरोधी आघाडीत धुसफूस वाढू लागली आहे. तर दुसरीकडे अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. विरोधकांनी या सोहळ्याला राजकारणाशी जोडत […]
मुंबई (प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी) : राज्याचे मुख्य सचिव असलेले मनोज सौनिक (Manoj Saunik) यांना तीन महिन्याची मुदतवाढ मिळेल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी मुख्य सचिव मनोज सौनिक आणि राज्याचे पोलीस महासंचालक हे निवृत्त होणार आहेत. या जागी कोणाची नियुक्ती होणार याविषयीची चर्चा प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. मोदी सरकारचं […]