मुंबई : भावांसोबत मिळून मुंबईमधील दोन एकर जमिनीचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. अबिदा जफर स्माइली असे या महिलेचे नाव असून तिला म्हैसूर (कर्नाटक) येथील एका हॉटेलमधून त्याला अटक केली आहे. तिने अपहार केलेल्या जमिनीची अंदाजे किंमत 100 कोटींच्या घरात आहे. तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून सध्या तिची चौकशी सुरु आहे. […]
Chandrashekhar Bavankule : भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून चांगलीच टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. ‘खरं तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बिघडले आहेत, त्यांना काही आठवत नाही.’ असा टोला त्यांनी लगावला आहे. पवारांच्या हॉस्पिटलमध्ये ठाकरे बिघडले… यावेळी बावनकुळे म्हणाले की, कालच्या दसरा मेळाव्यातील ठाकरेंचं रटाळ […]
Sanjay Raut : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
Maharashtra Politics : माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल अचानक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडालेली असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीचे आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. निलेश राणे अशी तडकाफडकी निवृत्ती का घेतली याचे उत्तर अजून समोर आलेले नाही. तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण […]
Road Accident : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काल विजयादशमीनिमित्त (Road Accident) दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यावरून (Dasara Melawa) परतत असणाऱ्या शिवसैनिकांच्या बसला भीषण अपघात झाला. मुंबई-आग्रा महामार्गावरील शहापूरजवळ वाहनांचा विचित्र अपघात झाला. आज मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात 25 जण जखमी झाल्याची माहिती […]
मुंबईः शिवतीर्थ येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपचा (BJP) जोरदार समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारवर टीका केली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे घराणेशाहीवरून काही पक्षांवर निशाणा साधत आहेत. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जोरदार सुनावले आहे. प्रत्येक वेळी कानफाट फोडलेय, पण निर्लज्जपणाने […]