पुणे : एमपीएससीने परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये केलेल्या बदलाच्या विरोधात पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएसी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थी आक्रमक झाले असून आज (ता.13 जानेवारी) सकाळपासूनच चौकात ठाण म्हणून बसले आहेत. आयोगाकडून परीक्षा अभ्यासक्रम पद्धतीमध्ये करण्यात आलेला बदल हा 2025 पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर चौकात पोलीस बंदोबस्त […]
मुंबई : मराठवाडयाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर नागपूरची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कोकणातील जागा शेतकरी कामगार पक्ष व अमरावती व नाशिक कॉंग्रेस लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. महाविकास आघाडीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने छापेमारी केली आहे. मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर, कार्यालयांवर ईडीसह आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, यापूर्वी मुश्रीफ यांच्यावर आयकर विभागाने […]
(प्रफुल्ल साळुंखे यांजकडून) मुंबई : राज्यातील निराधारांसाठी महत्वाचे ठरलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ अनाथांपर्यंत पोहचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन समवेत त्रिपक्षीय करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही संस्था भाजपचे विधान परिषदेतील आमदार श्रीकांत भारतीय यांच्याशी संबंधित आहे. या योजनेसाठी शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी लोकप्रतिनिधींच्या संस्थांना […]
पुणे : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे नाहीत. ते गृहमंत्री म्हणुन कुचकामी ठरतायत. माझ्या सभा रद्द केल्या जातात आणि तिथच भाजपच्या सभा होतात हा दुटप्पीपणा नाही का, अस म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपचे सोलापूरचे माजी जिल्याध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याकडून पत्नी म्हणून हक्क मिळवण्यासाठी लढत […]
पुणे : आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटेपासूनच गणेश भक्तांची दर्शनासाठी रांग लागली आहे. नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्यानं गणेशाच्या दर्षणाकरता भाविकांनी गर्दी पाहायला मिळतेय. आज अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरास विविध प्रकारच्या फुलांची आरास करण्यात आलीय. दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं मंदिरात स्वराभिषेक आयोजित करण्यात आलाय. पहाटे 4 […]