पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर…; घरात घुसून शुटींग करणाऱ्या पोलिसावर आव्हाड संतापले

पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर…; घरात घुसून शुटींग करणाऱ्या पोलिसावर आव्हाड संतापले

Jitendra Awhad : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर पोलीसांची (Police) नजर असल्याचं समोर आलं. आव्हाडांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलं होतं. ही पत्रकार परिषद ठाण्यातील आव्हाड यांच्या घरी होती. मात्र, यावेळी पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसले. पोलिसांकडून पत्रकार परिषदेचं शुटींग देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, घरात शिरून शुटींग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला आव्हाड यांनी पकडले. या पोलीस कर्मचाऱ्यावर आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

Video : पहिली पसंती फडणवीसांना, पण अजितदादा पालकमंत्री झाले तर…; धस स्पष्टच बोलले 

विरोधी पक्षांच्या आमदारांवर अशा प्रकारे पाळत ठेवण्यापेक्षा त्या वाल्मिक कराडवर पाळत ठेवा, पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली असती तर तो लवकर सापडला असता, असं आव्हाड म्हणाले.

पोलीस कर्मचाऱ्याला आव्हाड यांनी पकडल्यानंतर त्यांनी आपला संताव व्यक्त केला. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर लक्ष ठेवावे. आपण कोणाच्या घरी जातोय? आपल्याला काय अधिकार आहे? माझ्या घरात घुसताय, म्हणजे माझी काही प्रायव्हेसी आहे की नाही, तुम्ही घरात कसे आलात? अशी प्रश्नांची सरबत्ती आव्हाड यांनी केली. या प्रश्नांवर संबंधित पोलिसाने आपल्याला वरिष्ठांनी सांगितल्याचं म्हटलं.

‘वामा-लढाई सन्मानाची’ चं चित्रीकरण पूर्ण; गौतमी पाटीलचं आयटम सॉंग लक्षवेधी 

यावर पुन्हा आव्हाड म्हणाले, वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा टाकणार का? हा दरोडा आहे. माझ्या घरात चोरी झाली. मग याचा आळ मी तुमच्यावर घेतला तर? तूम्ही काय करताय हे तुम्हाला समजतंय का? एका विरोधी पक्षाच्या आमदाराच्या घरी जाऊन तुम्ही चित्रिकरण करता? पोलिसाची एवढी हिंमत? तुम्हाला इथं शुटींग करण्याचा अधिकार काय? हे माझे घर आहे, मला विचारयचां ना? आमचे खास आयुष्य आहे की नाही?, असा सवाल करत आव्हाडांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी आव्हाड यांनी पोलीस कर्मचाऱ्याला वरिष्ठांना फोन करण्यास सांगितलं. फोन करून आव्हाडांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही झापले.
तसेच जोपर्यंत वरिष्ठ इथं य़ेत नाहीत, तोपर्यंत मी या पोलीस कर्मचाऱ्याला सोडणार नाही, अशी भूमिका आव्हाडांनी घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube