‘हल्लेखोराच्या टार्गेटवर सैफ नाही तर..’, शरद पवार गटातील आमदाराचा धक्कादायक दावा

‘हल्लेखोराच्या टार्गेटवर सैफ नाही तर..’, शरद पवार गटातील आमदाराचा धक्कादायक दावा

Saif Ali Khan : सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याच्या घटनेला दोन दिवस (Saif Ali Khan) उलटून गेले आहेत. या दोन दिवसांत बऱ्याच घडामोडी घडल्या. सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. दुसरीकडे पोलिसांनी कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तर आता या प्रकरणात राजकारणही जोरात सुरू झाले आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) याआधी खळबळजनका दावा केला होता. सैफवरील हत्येमागे धार्मिक कट्टरतेचा वास येत असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता पुन्हा त्यांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी एक नवा अँगल मिळाला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की सैफ प्राणघातक हल्ल्यातून बचावला असला तरी हल्लेखोराला सैफचा मुलगा तैमूरला मारायचं होतं. पण तोही या हल्ल्यातून बचावला आहे. सत्य कुणीच सांगणार नाही. सत्य सांगायला कुणी पुढे येणारही नाही. तैमूरच्या नावामुळे त्याचा द्वेष केला जातो. समाजात ही एक विकृती पसरली आहे, असे आव्हाड यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Saif Ali Khan : मुलाचं नाव तैमुर ठेवल्यानेच..जितेंद्र आव्हाडांच्या मनात वेगळ्याचं शंका

जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टमध्ये काय?

प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले.

तैमूर समाज माध्यमांमध्ये जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे नावदेखील पौराणिकच आहे. त्याचा अरेबिक अर्थ आहे, ‘लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा!’ त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव “तैमूर” असे ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे.

सत्य सांगायला कुणीच पुढे येत नाही. तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube