मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर, आम आदमी पार्टीला दिलासा

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर, आम आदमी पार्टीला दिलासा

Arvind Kejriwal : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरूवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Courtenay) केजरीवालांना जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मंजूर झाल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. लोकसभा निवडणुकीच्या एक महिना आधी अटक झाल्यामुळं आम आदमी पक्षाकडून केंद्र सरकारवर आरोप करण्यात आला होता.  त्यानंतर  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना मे महिन्यात अंतरिम जामीनही मंजूर करण्यात आला होता. निवडणुका संपताच केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, आज केजरीवालांना जामीन मिळाला आहे. केजरीवाल यांना 1 लाख हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. त्यामुळे शुक्रवारी ते तुरुंगातून बाहेर येऊ शकतात.

हाकेंची प्रकृती पाहून वडेट्टीवारांना अश्रू, जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांची इतकी मुलं गेली तेव्हा…’ 

केजरीवालांना जामीन मिळणं हा ईडीसाठी मोठा झटका आहे. न्यायमूर्ती बिंदू यांनी जामीन मंजूर केल्यानंतर, कायदेशीर युक्तिवाद सादर करण्यासाठी ईडीकडून 48 तासांचा अवधी मागितला होता. मात्र न्यायाधीशांनी ईडीची मागणी फेटाळून जामीन दिला.

मद्य दारू घोटाळा प्रकरणात जामीन मिळवणारे खासदार संजय सिंह यांच्यानंतर अरविंद केजरीवाल हे दुसरे आप नेते आहेत. मात्र या प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अजूनही तिहार तुरुंगात आहेत.

दरम्यान, पदावर असताना अटक होणारे अरविंद केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री होते. त्याचे साथीदार मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनाही अटक करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज