राम मंदिर दर्शनासाठी कधी खुलं? विश्वस्त चंपत राय यांनी तारीखच सांगितली

राम मंदिर दर्शनासाठी कधी खुलं? विश्वस्त चंपत राय यांनी तारीखच सांगितली

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक सोहळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. येत्या 22 जानेवारीला रामलल्लांच्या (Ram Mandir) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी राम मंदिर दर्शनासाठी कधी खुलं होणार? याची चर्चा सुरु होती. हीच चर्चा सुरु असताना राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय (Champat Rai) यांनी तारीखच सांगितली आहे. 23 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी राम मंदिर खुलं होणार असल्याचं चंपत राय यांनी सांगितलं आहे. राय पत्रकार परिषदेत बोलत होते.

अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी उत्तर प्रदेशात सरकारकडून येत्या 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गतवेळी अपघाताने खासदार झालात, 2024 ला माजी होणार! तानाजी सावंतांचे ओमराजेंना आव्हान

येत्या 20 ते 24 जानेवारी 2024 च्या दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी सहभागी होऊ शकतात. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून त्याची अंतिम तरिख निश्चित झालेली नाही. राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात प्रभू श्रीरामांची मूर्ति मंदिराच्या गर्भगृहात स्थापन केली जाणार आहे.

‘कारसेवक लाठ्या खात होते, तेव्हा तुम्ही वाघाचे फोटो काढत होता’; फडणवीसांची ठाकरेंवर बोचरी टीका

14 जानेवारीला संक्रांतीपासून 10 दिवसांचा हा कार्यक्रम असणार आहे. तसेच कार्यक्रमानंतर कदाचित 24 जानेवारीला भाविकांसाठी मंदिर खुलं होणार असल्याची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी राम मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले असून अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. 22 जानेवारी 2024 रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube