मोठी बातमी! अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश; प्रकरण काय?
Nirmala Sitharaman : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याशी (Nirmala Sitharaman) संबंधित एक बातमी आली आहे. बंगळुरू येथील एका न्यायालयाने अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या विरोधात सक्तीच्या वसुलीच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बंगळुरूत (Bengaluru) लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने थेट अर्थमंत्र्यांवरच एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून (इलेक्टोरल बाँड्स) सक्तीच्या वसुलीच्या आरोपांसंदर्भात हे आदेश देण्यात आले आहेत. जनाधिक संघर्ष संघटनेच्या आदर्श अय्यर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यासह आणखी काही जणांविरुद्ध तक्रार दाखल (पीसीआर) केली होती. निवडणूक रोख्यांच्या माध्यमतून जबरदस्तीने वसुली करण्यात आली असा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता.
Union Budget : सातव्यांदा बजेट मांडून रचणार इतिहास; सितारमण तोडणार ‘या’ नेत्याचं रेकॉर्ड
यानंतर बंगळुरूतील जनप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने सितारमण यांच्याविरुद्ध थेट एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश 42 व्या एसीएमएम कोर्टाने दिले आहेत. यानंतर टिळकनग पोलीस गुन्हा दाखल करतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
केंद्र सरकारने सन 2018 मध्ये निवडणूक रोख्यांची योजना सुरू केली होती. राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या देणग्यांची जागा या रोख्यांनी घ्यावी असा उद्देश यामागे होता. राजकारणात होणाऱ्या फंडिंगमध्ये सुधारणा व्हावी हा उद्देश यामागे होता. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी दिला जात होता. परंतु, याचा खुलासा केला जात नव्हता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली होती. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिकाही दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने ही योजनाच रद्द केली होती.
एनपीएस वात्सल्य योजना आहे तरी काय? मुलांच्या भविष्याची काळजीच मिटेल; जाणून घ्या, सर्वकाही..