दिल्लीच्या आतिशी सरकारची कामगारांना भेट; दिवाळीपूर्वीच किमान वेतनात केली भरघोस वाढ
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतलेल्या आतिशी मर्लेना (Atishi Marlena) यांनी पहिलाच धडाकेबाज निर्णय घेत मास्टरस्ट्रोक मारला आहे. अतिशी यांनी कामगारांसाठी किमान वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार अकुशल कामगारांसाठी 18,066 रुपये, अर्धकुशल कामगारांसाठी 19,929 रुपये आणि कुशल कामगारांसाठी 21,917 रुपये किमान वेतन जाहीर करण्यात आले आहे.
Delhi CM Atishi announces Rs 18,066 minimum wage for unskilled, Rs 19,929 for semi-skilled, and Rs 21,917 for skilled workers
— Press Trust of India (@PTI_News) September 25, 2024
कामगार मंत्री मुकेश अहलावत यांनी अप्रशिक्षित कामगारांना 18 हजार 66 रुपये, अर्धप्रशिक्षित कामगारांना 19 हजार 29 रुपये आणि प्रशिक्षित कामगारांना 21 हजार 17 रुपये किमान वेत दिले जाईल असा निर्णय घेतल्याचे आतिशी यांनी सांगितले. पुढे बोलताना आतिशी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, “भाजप गरीब विरोधी, कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आहे. हाच भाजप आहे ज्याने शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पाकिस्तानच्या सीमेपेक्षा दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर कडक बंदोब्त लावला. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी जेवढं काही करता येईल ते करणारी भाजपचं आहे. ज्यावेळी लाखो शेतकरी सिंधू सीमेवर बसले होते तेव्हा त्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणून संबोधण्यात आले.
किमान वेतन काय आहे?
किमान वेतन ही किमान रक्कम आहे जी नियोक्त्याने कायदेशीररित्या त्याच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे. एकप्रकारे ही वेतनाची मर्यादा आहे, ज्याच्या खाली कोणत्याही कर्मचाऱ्याला पगार देता येत नाही. भारतात वेळोवेळी राज्य सरकारांकडून निर्णय घेतला जातो. सर्व कर्मचाऱ्यांना किमान एक निश्चित रक्कम मिळावी हा त्याचा उद्देश आहे. भारतात किमान वेतन कायदा, 1948 अंतर्गत किमान वेतन निर्धारित केले जाते. या कायद्याअंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारे वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळे किमान वेतन ठरवतात.
केजरीवालांचे मोहन भागवतांना पत्र! अडवाणींचा निवृत्तीचा नियम मोदींना लागू होणार का? ‘५’ प्रश्न कोणते?
दिल्लीतील सर्वोच्च किमान वेतन
भारतात दिल्ली आणि केरळ या केंद्रशासित प्रदेशांमध्ये किमान वेतन सर्वाधिक आहे. दिल्लीतील अकुशल कामगारांसाठी किमान मासिक वेतन यापूर्वी 17,494 रुपये निश्चित करण्यात आले होते, ते आता वाढवण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर किमान वेतन 178 रुपये प्रतिदिन आहे.