फिनटेक कंपन्यांना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले चार मंत्र! व्यवसाय झपाट्याने वाढवण्यासाठी फॉर्म्युला
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 दरम्यान भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील प्रमुख फिनटेक कंपन्यांना चार महत्त्वाचे मंत्र दिले.

Finance Minister Nirmala Sitharaman Tips To Fintech Companies : ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 दरम्यान भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील प्रमुख फिनटेक कंपन्यांना चार महत्त्वाचे मंत्र दिले. त्यांनी सांगितले की, आता फिनटेक क्षेत्राला केवळ इनोव्हेशनवर नव्हे, तर व्यवसायाचे मूलभूत तत्त्व, विश्वास, सुरक्षितता आणि समावेशन या गोष्टींवरही भर द्यावा लागेल.
डिजिटल फिनटेक इकोसिस्टम
निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या, फिनटेक कंपन्यांनी त्यांच्या महसूलवाढीबरोबरच प्रॉडक्ट इनोव्हेशन, रिस्क मॅनेजमेंट आणि नियामक निकष पाळण्यावरही लक्ष द्यावे. इनोव्हेशन आणि व्यवसायाच्या शिस्तीत संतुलन राखणाऱ्या कंपन्याच दीर्घकाळ टिकाऊ ठरतात. त्यांनी पुढे सांगितले की, डिजिटल फिनटेक इकोसिस्टमसमोर सायबरसुरक्षा, डिजिटल फसवणूक आणि चुकीच्या कर्ज पद्धतींचे मोठे आव्हान (Finance Minister) आहे. त्यामुळे या क्षेत्राने फक्त नवे प्रयोग न करता विश्वास, सुरक्षितता आणि सर्वसमावेशकता यांनाही प्राधान्य द्यावे.
धोरणात्मक चौकट तयार
फिनटेक कंपन्यांना त्यांनी नियामक संस्थांसोबत सहकार्य करण्याचे आवाहन केले. रेग्युलेशन म्हणजे अडथळा नाही, तर सुरक्षित गतीसाठी सीट बेल्ट आहे, असं देखील निर्मला सीतारामन म्हणाल्या. सरकार आणि रिझर्व्ह बँकेने मिळून एक लवचिक (Fintech Companies) आणि जबाबदार धोरणात्मक चौकट तयार केली. ती कंपन्यांना नियंत्रित वातावरणात नवे प्रयोग करण्याची मुभा देते. तसेच, वित्तीय व्यवस्थेतील त्रुटी भरून काढण्यासाठी फिनटेक कंपन्यांनी तंत्रज्ञान आणि नवकल्पना वापराव्यात, असेही त्यांनी सांगितले. विशेषतः एमएसएमई क्षेत्र, महिला (Phonepe And Paytm) आणि युवकांसाठी कर्ज व आर्थिक समावेशन सुलभ करण्यावर त्यांनी भर दिला.
सीतारामन यांनी फिनटेक कंपन्यांना दिलेले हे चार मंत्र पुढीलप्रमाणे आहेत —
1. व्यवसायाच्या मूलभूत तत्त्वांवर लक्ष केंद्रित करा.
2. विश्वास, सुरक्षितता आणि समावेशन वाढवा.
3. नियामक संस्थांशी सहकार्य ठेवा.
4. वित्तीय व्यवस्थेतील उणीवा दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा.
या मार्गदर्शनामुळे PhonePe, Paytm आणि इतर फिनटेक कंपन्यांना येत्या काळात आपला व्यवसाय अधिक जबाबदारीने आणि वेगाने वाढवण्याची दिशा मिळणार आहे.