पाटणा-देवघर पॅसेंजरच्या डब्यांना आग, प्रवाशांनी उड्या मारत वाचवले जीव
Bihar Train Fire : बिहारमधील लखीसराय (Lakhisarai) जिल्ह्यातील पाटणा-देवघर ईएमयू पॅसेंजर (Patna-Deoghar EMU Passenger) ट्रेनला गुरुवारी भीषण आग लागली. मात्र, आग पसरण्याआधीच उड्या मारून आपला जीव वाचवला. काही मिनिटांत आग ट्रेनच्या काही बोगीत पसरली. यामुळे तीन डब पूर्णपणे जळून खाक झाले. सध्या प्रशासन अग्निशमन दलाकडून (fire brigade) आग विझवण्याच्या प्रयत्नात करत आहे.
मुंज्यामध्ये शर्वरीचं ‘बाहुबली’ कनेक्ट! म्हणाली हा एक रोमांचक अनुभव
मिळालेल्या माहितीनुसार, लखीसराय जिल्ह्यातील किउल जंक्शनवर संध्याकाळी ईएमयू ट्रेन उभी होती. त्यावेळी ट्रेनला अचानक भीषण आग आग लागली. आग लागताच रेल्वेची मधली बोगी जळू लागली. त्यानंतर ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी आरडाओरडी करत जीव वाचण्यासाठी रेल्वेतून उड्या मारल्या. किउल जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर ही घटना घडली.
#WATCH | Lakhisarai, Bihar: Fire breaks out in the coaches of a Patna-Jharkhand passenger train. Efforts are underway to douse off the fire. Details are awaited. pic.twitter.com/GMg3SRMyTP
— ANI (@ANI) June 6, 2024
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रवेशिकेस मुदतवाढ; या दिवशीपर्यंत करता येणार अर्ज
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पाठवल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासनाला यश आले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे एक ते दीड तास लागला.
आगीत कोणतीही जीवित हानी नाही…
या घटनेबाबत लोको पायलट अविनाश कुमार यांनी सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. सर्व प्रवाशांना सुखरुप ट्रेनमधून उतरवण्यात आले आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आग कशी लागली याचा तपास रेल्वे प्रशासन करत आहे. स्थानकावरही लोकांची मोठी गर्दी झाली होती.