भाविकांवर काळाचा घाला! कार अन् ट्रकच्या धडकेत सात भाविक ठार; एक जखमी

भाविकांवर काळाचा घाला! कार अन् ट्रकच्या धडकेत सात भाविक ठार; एक जखमी

Road Accident in Gujarat : गुजरात राज्यातील साबरकांठा येथे भीषण अपघात झाला (Road Accident) आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी श्यामला जी मंदिरातून दर्शन घेऊन माघारी परतत होते. त्याचवेळी भरधाव वेगातील ही कार एका ट्रकच्या मागील बाजूला धडक देत आत घुसली. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कारमधील प्रवाशांना मोठ्या कष्टाने बाहेर काढण्यात आले. कटरने कारचा काही भाग कापून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढावे लागले. या कारमध्ये एकूण आठ प्रवासी होते. यामध्ये एका प्रवाशाव्यतिरिक्त सर्व सात प्रवासी जागेवरच ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुरा झाला. ट्रकच्या पाठीमागून कार आत घुसली होती. कार भरधाव वेगात होती. कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाला कटरचा वापर करावा लागला.

Pravin Dabas Accident: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा भीषण कार अपघात, गंभीर अवस्थेत ICU मध्ये दाखल

या अपघातात सर्व मयत प्रवासी अहमदाबाद शहरातील होते. हा अपघात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताची माहिती घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात मृतांची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे.

दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.

बोलेरो-ट्रकचा भीषण अपघात! एकाच गावातील तीन युवक ठार; गावावर शोककळा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube